आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने मानले "लोकमत"चे आभार
By Admin | Updated: April 10, 2017 19:50 IST2017-04-10T19:50:06+5:302017-04-10T19:50:06+5:30
सैराट चित्रपटातून मराठी सिनेरसिकांना आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने भुरळ घातली. मात्र, सैराटमध्ये काम करेपर्यंत आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचं आहे याबबात तिने काहीही नक्की ठरवलं नव्हतं.

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने मानले "लोकमत"चे आभार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - सैराट चित्रपटातून मराठी सिनेरसिकांना आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने भुरळ घातली. मात्र, सैराटमध्ये काम करेपर्यंत आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचं आहे याबबात तिने काहीही नक्की ठरवलं नव्हतं. लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017"- सिनेमा(महिला) या श्रेणीत नामांकन मिळाल्याबद्दल तिने "लोकमत"चे आभार मानले.
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे. यावेळी लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017"- सिनेमा(महिला) या श्रेणीत नामांकन मिळाल्याबद्दल तिने लोकमतचे आभार मानले. वयाच्या 16 व्या वर्षी राष्ट्रपती पुरस्कार जिंकणारी रिंकू याबाबत म्हणते, सैराटमध्ये काम केल्यानंतरच चित्रपट माझी आवड असल्याचं मला समजलं.
गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर यंदा लोकमतचं नामांकन मिळणं हा मी माझा सन्मान समजते, इतक्या दिग्गजांसोबत मला नामांकन मिळाल्याने खूप काही साध्य झाल्यासारखं वाटतंय असं रिंकू म्हणाली. रिंकूसोबत या श्रेणीत तेजश्री प्रधान, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर आणि सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रींना नामांकन मिळालं आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. परिणामी मंगळवारी मुंबईतील भव्य सोहळ््यात एकापरीने तेजाने तेजाची आरती होणार आहे.