"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:59 IST2025-06-11T10:58:40+5:302025-06-11T10:59:13+5:30

पत्नी शूरा खानच्या प्रेग्नंसीबद्दल अरबाजने केलं कन्फर्म, पुन्हा बाबा होण्याबद्दल म्हणाला...

Arbaaz Khan reacts on wife sshura khan being pregnant says excited about fatherhood | "हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."

"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."

अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खान (Arbaaz Khan) वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची दुसरी पत्नी शूरा खान (Sshura Khan) प्रेग्नंट आहे. काही दिवसांपूर्वीच अरबाज आणि शूरा एकत्र दिसले होते. यावेळी शूराचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता आणि अरबाज तिची काळजी घेत होता. मलायकाशी घटस्फोटानंतर सहा वर्षांनी अरबाजच्या आयुष्यात शूराच्या रुपात पुन्हा प्रेम आलं. आता दोघंही वैवाहिक आयुष्याच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज झाले आहेत.

शूरा प्रेग्नंट आहे का? तू बाबा होणार आहेस का? या प्रश्नांवर अखेर अरबाज खानने उत्तर दिलं आहे. 'दिल्ली टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खान म्हणाला, "हो, हे खरं आहे. आता सगळ्यांनाच हे कळालं आहे. आमच्या दोघांसाठी हा खूपच रोमांचक काळ आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत."

तो पुढे म्हणाला, "हो नर्व्हस तर वाटतंच. कोणालाही वाटेल. मीही बऱ्याच वर्षांनी पुन्हा फादरहुड एन्जॉय करणार आहे. एकदम नवी भावना असल्यासारखंच वाटत आहे. पण तेवढीच उत्सुकताही आहे. या बातमीमुळे माझ्यात आनंदाची आणि जबाबदारीचीही भावना निर्माण झाली आहे. मला हे खूप आवडतंय. मी कसा बाबा होईन हे आपण कुठल्या कॅटेगरीत मांडू शकत नाही. तुम्हाला फक्त चांगला पालक होण्याचा प्रयत्न करायचा असतो. जो आपल्या बाळासाठी कायम उभा असेल, त्याच्याकडे लक्ष ठेवून असेल, काळजी घेणारा अशेल, प्रेम करणारा असेल आणि त्याला हवं ते पुरवणारा असेल. हेच मला करायचं आहे."

शूरा आणि अरबाज २०२०३ साली लग्नबंधनात अडकले. शूराचंही हे दुसरं लग्न आहे. तर पहिल्या पतीपासून तिला एक मुलगी आहे. तसंच अरबाजला मलायकापासून अरहान हा मुलगा आहे. अरहान सध्या २२ वर्षांचा आहे. 

Web Title: Arbaaz Khan reacts on wife sshura khan being pregnant says excited about fatherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.