'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! खरेदी केली महागडी गाडी; म्हणाले, "आज नवीन…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:04 IST2025-11-23T09:53:03+5:302025-11-23T10:04:56+5:30
'अप्पी आमची कलेक्टर'फेम अभिनेत्याचं चार चाकीचं स्वप्न पूर्ण! कुटुंबासह केली नव्या गाडीची पूजा, म्हणाले...

'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! खरेदी केली महागडी गाडी; म्हणाले, "आज नवीन…"
Marathi Actor Santosh Patil: छोट्या पडद्यावरील काही मोजक्याच मालिका अशा असतात ज्या कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेत्री शिवानी नाईक,रोहित परशुराम, संतोष पाटील, जोत्स्ना पाटील, आदित्य भोसले तसेच बालकलाकार साईराज केंद्रे असे अनेक कलाकार मंडळी झळकलेल्या या मालिकेने जवळपास तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार कायम चर्चेत असतात.या मालिकेत अप्पीच्या वडिलांची भूमिका अभिनेते संतोष पाटील यांनी साकारली होती. सध्या एका खास गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत.
नुकताच संतोष पाटील यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकांउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.या व्हिडीओद्वारे त्यांनी चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेते संतोष पाटील यांनी त्यांचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. नुकतीच त्यांनी एक नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. या गाडीबरोबरचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे."पुन्हा एकदा नवीन पायरी गाठली आणि ती आनंदाची लहर आली,,,सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद लाभले आणि आज नवीन स्वप्न गाठले...", असं सुंदर कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.टाटा ब्रँडची Nexon ही गाडी खरेदी करून त्यांनी चार चाकीचं स्वप्न पूर्ण केलं आहे.यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
वर्कफ्रंट
'लागिरं झालं जी' मालिकेमुळे संतोष पाटील यांना चांगली लोकप्रियता मिळाली. मूळचे साताऱ्याचे असलेले संतोष पाटील स्थानिक नाटकातून अभिनयाची आवड जोपासत होते. 'लागिर झालं जी' मालिकेसह त्यांनी 'अप्पी आमची कलेक्टर', 'साताजन्माच्या गाठी','मुलगी झाली हो' तसेच 'सहकुटंब सहपरिवार 'यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आजवर ते वेगवेगळ्या मालिकांमध्ये नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले.