अजयशिवाय ‘गोलमाल-4’ अपूर्ण - रोहित शेट्टी

By Admin | Updated: May 22, 2016 02:01 IST2016-05-22T02:01:54+5:302016-05-22T02:01:54+5:30

शाहरुख खानसोबत दिलेवालेच्या अपयशानंतर रोहित शेट्टीसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. गोलमाल सिरीजच्या चौथ्या चित्रपटाच्या कथेवर काम करण्यास त्याने सुरुवात केली आहे

Apart from Ajay, 'Golmaal-4' is incomplete - Rohit Shetty | अजयशिवाय ‘गोलमाल-4’ अपूर्ण - रोहित शेट्टी

अजयशिवाय ‘गोलमाल-4’ अपूर्ण - रोहित शेट्टी

शाहरुख खानसोबत दिलेवालेच्या अपयशानंतर रोहित शेट्टीसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. गोलमाल सिरीजच्या चौथ्या चित्रपटाच्या कथेवर काम करण्यास त्याने सुरुवात केली आहे. याची माहिती स्वत: रोहित देत असला तरी त्याच्या टीम सदस्यांच्या मते ‘गोलमाल-4’ साठी अजय देवगणकडून होकार मिळालेला नाही. गोलमालच्या तिन्ही चित्रपटाचा नायक असलेला अजय सध्या होम प्रोडक्शनच्या ‘शिवाय’मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: अजय करतो आहे. ‘शिवाय’चे शूटिंग संपल्यावर अजयने आणखी दोन चित्रपटांत काम करण्यास होकार दिला आहे. यापैकी एक मिलन लथूरियाच्या दिग्दर्शनात तयार होणारी ‘बादशाहो’ असेल. यात अजय देवगन सोबत सूरज पांचोलीची भूमिका आहे. यानंतर अजय देवगन पुढील वर्षी आणखी एका चित्रपटात काम करणार आहे. गोलमालमध्ये काम करण्याविषयी अजयला छेडल्यावर त्याचा प्रतिसाद ‘गोलमाल’ करणारा दिसतो. नुकताच अजयला ‘गोलमाल-४’ मध्ये काम करण्याबाबतचा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देणे त्याने टाळले व फारच व्यस्त असल्याचे कारण सांगितले. रोहित शेट्टीसाठी ही धर्मसंकटात टाकणारी गोष्ट आहे. त्याने अजयला फ्री होण्याची वाट पाहावी की कुण्या दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन ‘गोलमाल-4’ पूर्ण करावा. अजय देवगनच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेणे रोहितसाठी कठीण काम आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. कॉर्पोेरेट हाऊसेस केवळ अजय आपला भरवसा दर्शवतील.

Web Title: Apart from Ajay, 'Golmaal-4' is incomplete - Rohit Shetty