प्रमोशनसाठी काहीही...

By Admin | Updated: February 25, 2016 03:42 IST2016-02-25T03:42:38+5:302016-02-25T03:42:38+5:30

चित्रपटाचे शेड्युल व दिग्दर्शकाच्या डिमांडनुसार शॉट्स दिले की, कलावंतांचे काम संपले, असे आता होत नाही. शूटिंग पूर्ण झाले की, लगेच प्रमोशनच्या कामाला लागावे लागते.

Anything for promotion ... | प्रमोशनसाठी काहीही...

प्रमोशनसाठी काहीही...

चित्रपटाचे शेड्युल व दिग्दर्शकाच्या डिमांडनुसार शॉट्स दिले की, कलावंतांचे काम संपले, असे आता होत नाही. शूटिंग पूर्ण झाले की, लगेच प्रमोशनच्या कामाला लागावे लागते. कलाकारांनी वेळ नसल्याचे कारण सांगून यातून पळवाट शोधू नये, म्हणून निर्माता-दिग्दर्शक त्या कलावंतांच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच तसे नमूद करीत असतात. इतके या प्रमोशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी प्रमोशनचे विविध फंडे वापरले जात आहेत. यात कुणी थेट बॉक्सरच्या रूपात रिंगमध्ये हात आजमावत आहे, तर कुणी वेश बदलून देशाच्या परिक्रमेवर जाऊन आला आहे. अर्जून कपूर-करीना कपूर यांच्या आगामी ‘की अँड का’ या चित्रपटाच्या एका गाण्यात अर्जुनने हायहिल्स घालून डान्स केला आहे. हायहिल्समधले अर्जुनचे पोस्टर्स आणि त्याच्या ट्रेलरचे दृश्य प्रमोशनसाठी वापरले जात आहेत. या आधीही अनेक स्टार्सनी आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या क्लुत्या वापरल्या आहेत. त्यावर एक नजर...

साला खडूस
आर. माधवनचा डिफरंट लूक आणि हृदयस्पर्शी अभिनयामुळे गाजलेल्या ‘साला खडूस’ या चित्रपटाची कथा झोपडपट्टीत राहाणाऱ्या एका गरीब मुलीवर आधारित होती. ही मुलगी दारिद्र्याशी संघर्ष करीत असतानाही, यशस्वी बॉक्सर होण्याचे स्वप्न पाहते आणि तिला या तिच्या गंतव्यावर पोहोचविण्यासाठी आर. माधवन तिला मदत करतो, अशी या चित्रपटाची कथा होती. म्हणूनच या चित्रपटासाठी खरीखुरी बॉक्सर नायिका निवडण्यात आली. रितिका सिंग असे तिचे नाव. रितिकाने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वत: रिंगमध्ये उतरून प्रतिस्पर्ध्याला जोरदार ठोसे लगावले.

प्रेम रतन धन पायो
कथा दमदार नसूनही बॉक्स आॅफिसवर मोठी कमाई करणाऱ्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे अगदी जोरदार प्रमोशन करण्यात आले. राजश्री प्रोडक्शन तसेही या कामात मास्टर आहे. त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खानच होस्ट करीत असलेल्या ‘बिग बॉस’ या शोचा आधार घेतला. चित्रपटाची संूपर्ण टीम ऐन दिवाळीच्या दिवसात या शोमध्ये आली. घरी साधा चहाही न बनवणाऱ्या सलमान, सोनम आणि नील नितीन मुकेश यांनी या शोमध्ये चक्क किचन गाठून स्वयंपाक केला. आहे की नाही, एनिथिंग फॉर मुव्ही प्रमोशन...?

पिपली लाइव्ह
महंगाई डायन खाये जात हैं....या गाण्यामुळे विशेष गाजलेल्या आमीर खानच्या ‘पिपली लाइव्ह’ या चित्रपटाचे प्रमोशनही भन्नाट झाले. आमीरने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क आपले रूपडे बदलून देशभरातील सात शहरांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे, त्याचा गेटअप इतका वेगळा होता की, या शहरातील त्याच्या चाहत्यांनाही हा आमीर आहे हे ओळखता आले नाही, परंतु त्याच्या या प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीचा खूप फायदा झाला आणि देशभरातील मीडियाने या चित्रपटाला जोरदार प्रमोट केले.

मस्तीजादे
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मस्तीजादे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर वीर दास या कलावंतांने गजबच केले. अंगावर एकही कपडे नसताना तो धावतोय, असे त्याचे फोटो व्हायरल झाले. हे दृश्य साकारताना तो खरच नैसर्गिक अवस्थेत होता की कसे हे माहीत नाही, परंतु त्याचे तसले फोटो मात्र खूप गाजले. प्रमोशनचा हा जगावेगळा फंडा मात्र जोरदार चर्चेत राहिला.

Feature:-
rupali.mudholkar@lokmat.com

Web Title: Anything for promotion ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.