‘सुलतान’साठी अनुष्का शर्माचा हटके लूक

By Admin | Updated: April 29, 2016 17:46 IST2016-04-29T17:46:12+5:302016-04-29T17:46:49+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘सुलतान’ या आगामी चित्रपटातील हटके लूक रिलिज झाला आहे. हा हटके लूक खुद्द अनुष्का शर्माने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

Anushka Sharma's Late Look for 'Sultan' | ‘सुलतान’साठी अनुष्का शर्माचा हटके लूक

‘सुलतान’साठी अनुष्का शर्माचा हटके लूक

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘सुलतान’ या आगामी चित्रपटातील हटके लूक रिलिज झाला आहे. हा हटके लूक खुद्द अनुष्का शर्माने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 
अनुष्का शर्माने ट्विट केलेल्या या पोस्टरवर तीने स्वत:  प्रतिस्पर्ध्याला कुस्तीच्या आखाड्यात लोळवताना दिसत आहे.  ‘सुलतान’ या चित्रपटात हरयाणा की शेरनी आरफा या कुस्तीपटूची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी तिला कुस्तीचा धोबीपछाड हा डाव शिकण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे.  ‘सुलतान’चे दिग्दर्शन अली अब्बास झफर यांनी केले आहे. 
अनुष्का शर्मा ‘सुलतान’ या चित्रपटासोबतच 'ये दिल हैं मुश्किल' या चित्रपटासाठी शूटींग करत आहे.  'ये दिल हैं मुश्किल' मध्ये अनुष्का शर्मा सोबत ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांच्या भूमिका आहेत. 
तसेच, ‘सुलतान’ मध्ये अनुष्का शर्मासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता सलमान खान आहे. सलमान खाननेही कुस्तीचे खास धडे घेतले आहे. 'सुलतान' हा चित्रपट यंदा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: Anushka Sharma's Late Look for 'Sultan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.