B'DAY SPL: जेव्हा या गोष्टीवरुन अनुष्कासमोर ढसाढसा रडला होता विराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 10:13 IST2018-05-01T10:11:49+5:302018-05-01T10:13:35+5:30

अनुष्काचा हा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. गेल्यावर्षीच अनुष्काने विराट कोहलीसोबत लग्न केलं. 

Anushka Sharma Birthday : When Virat Kohli cry in front of Anushka | B'DAY SPL: जेव्हा या गोष्टीवरुन अनुष्कासमोर ढसाढसा रडला होता विराट

B'DAY SPL: जेव्हा या गोष्टीवरुन अनुष्कासमोर ढसाढसा रडला होता विराट

मुंबई : अभिनेत्री अऩुष्का शर्माचा आज तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. 1 मे 1988 रोजी अनुष्काता जन्म अयोध्यामध्ये झाला होता. बंगळुरुमध्ये लहानाची मोठी झालेल्या अनुष्काने आर्मी स्कूल आणि माऊंट कार्मेल स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. अनुष्काचा हा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. गेल्यावर्षीच अनुष्काने विराट कोहलीसोबत लग्न केलं. 

विराट कोहली आणि अनुष्काची लव्हस्टोरीची नेहमीच चर्चा होत असते. कारण त्यांची लव्हस्टोरी फारच रोमांचक अशी आहे. दोघांनी आपल्या रिलेशनशिपबाबत कुणालाच काही सांगितले नाही आणि अचानक दोघांनी लग्न केले. 

आज अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त या दोघांच्या लव्हस्टोरीतील एक खास किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विराटने अनुष्काबाबत एक गोष्ट सांगितली होती. यावेळी त्याने सांगितले होते की, तो अनुष्कासमोर एकदा रडला होता. 

झालं असं होतं की, विराट कोहली याला तो टीम इंडियाचा टेस्ट टीमचा कर्णधार झाला हे कळले तेव्हा त्याच्यासोबत अनुष्का होती. आणि या बातमीच्या आनंदाने तो अनुष्कासमोर जोरजोरात रडला होता. महत्वाची बाब म्हणजे विराट अनुष्काला त्याची लकी चार्म मानतो. 

विराट म्हणाला होता की, 'मला आठवतं की, मी त्यावेळी मोहालीमध्ये होतो. तिथे टेस्ट सीरिज सुरु होती. त्यावेळी अनुष्का माझ्यासोबत होती'.

Web Title: Anushka Sharma Birthday : When Virat Kohli cry in front of Anushka