अनुष्का - शाहरूख एकत्र

By Admin | Updated: July 1, 2016 00:59 IST2016-07-01T00:59:58+5:302016-07-01T00:59:58+5:30

इम्तियाज अलीच्या पुढच्या सिनेमात शाहरूख आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे.

Anushka - Sean collects | अनुष्का - शाहरूख एकत्र

अनुष्का - शाहरूख एकत्र


इम्तियाज अलीच्या पुढच्या सिनेमात शाहरूख आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. या चित्रपटात किंग खानची लीडिंग लेडी कोण असणार याबाबत मात्र उत्सुकता होती. दीपिका आणि अनुष्काची नावे यामध्ये सर्वांत पुढे होती. परंतु दोघींनी या विषयावर बोलण्याचे टाळले होते. पण अखेर खुद्द अनुष्कानेच या रहस्यावरील पडदा उचलला आहे. अनुष्का लवकरच शाहरूखसोबत इम्तियाज अलीच्या पुढच्या सिनेमाची शूटिंग सुरू करणार आहे. माझे वेळापत्रक एवढे व्यस्त आहे की, मला एक दिवसाची सुटी घेणेदेखील शक्य नाही. त्यामुळे याआधी मी याबाबत बोलायचे टाळत होते. अनुष्काने इंडस्ट्रीमध्ये शाहरूखसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर दोघांनी ‘जब तक है जान’मध्ये एकत्र काम केलेले आहे. आता त्यांची फ्रेश जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार म्हटल्यावर चाहते एकदम खूश झाले आहेत.

Web Title: Anushka - Sean collects