विराटला आवडला अनुष्काचा पीके
By Admin | Updated: December 12, 2014 23:29 IST2014-12-12T23:29:09+5:302014-12-12T23:29:09+5:30
पीके या चित्रपटात एका वेगळ्याच लूकमध्ये असलेल्या अनुष्का शर्माने सांगितले की, तिचा बॉयफ्रेंड असलेल्या विराट कोहलीला हा चित्रपट खूप आवडला आहे.

विराटला आवडला अनुष्काचा पीके
पीके या चित्रपटात एका वेगळ्याच लूकमध्ये असलेल्या अनुष्का शर्माने सांगितले की, तिचा बॉयफ्रेंड असलेल्या विराट कोहलीला हा चित्रपट खूप आवडला आहे. चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये जेव्हा अनुष्काला विचारण्यात आले की, पीकेबाबत विराटची काय प्रतिक्रिया आहे, त्यावर तिने उत्तर दिले की, त्याला हा चित्रपट खूप आवडला. चित्रपटातील अनुष्काचा को-स्टार आमिर खान अनुष्काला मध्येच थांबवत म्हणाला की, ‘मी सांगतो, की विराटने काय सांगितले असेल. मला हा चित्रपट थ्री इडियट्सपेक्षा जास्त आवडला आहे.’ त्यानंतर चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांनीही अनुष्काची गंमत करायचे ठरवले. ते म्हणाले, ‘विराट असेही म्हटला की, अनुष्का वर्ल्डकपमधील यश
आहे.’