अनुपम खेर करणार ५००वा चित्रपट
By Admin | Updated: June 15, 2016 21:50 IST2016-06-15T21:39:08+5:302016-06-15T21:50:44+5:30
६१ वर्षीय अनुपम खेर यांनी ट्विट करत आपण ५००वा चित्रपट साईन केला असल्याची माहीती आपल्या चाहत्यांना दिली आहे. हा चित्रपट हॉलिवूडचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनुपम खेर करणार ५००वा चित्रपट
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - अनुपम खेर यांचा जन्म ७ मार्च, १९५५ रोजी शिमला, हिमाचल प्रदेश येथे झाला. अनुपम खेर हे हिन्दी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले कलाकार आहेत. त्यांनी ४९९ चित्रपटांत आणि १०० हून अधिक नाटकांत काम केले आहे. ६१ वर्षीय अनुपम खेर यांनी ट्विट करत आपण ५००वा चित्रपट साईन केला असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. हा चित्रपट हॉलिवूडचा असल्याचेही त्यांनी सांगितले. या चित्रपटाचे नाल ‘द बिग सीक’ असे आहे. यामध्ये ते पाकिस्तानात जन्मलेल्या अमेरिकन नागरिकांची भूमिका करणार आहेत.
पाकिस्तानात जन्मलेला अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन महिलेच्या प्रेमकथेवर आधारित ह्या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होणार याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. लवकरच अनुपम खेर हे परदेशात चित्रीकरणास जाणार हे मात्र नक्की.
Thank you everybody for your love and best wishes on my 500th film #TheBigSick. You people make feel happening.:) pic.twitter.com/bHlIoFpDFo— Anupam Kher (@AnupamPkher) June 15, 2016