टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:25 IST2025-12-25T15:24:00+5:302025-12-25T15:25:31+5:30
अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. त्याच्या डोक्याला, हाताला दुखापत झाल्याचं दिसत आहे.

टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
टीव्ही अभिनेता अनुज सचदेवाला सोसायटीतील एका व्यक्तीने मारहाण केली होती. पार्किंगच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. किरकोळ वादातून अभिनेत्याला अक्षरश: डोक्यात वार केले गेले. काठीने पाठीत मारण्यात आलं. त्या व्यक्तीने वाईट शब्दात शिव्या दिल्या. अनुजने व्हिडीओ शेअर करत हा प्रकार दाखवलाही होता. आता अनुजने त्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सोसायटीतील त्या व्यक्तीला अद्याप अटक झाली नसल्याचं तो म्हणाला.
अनुज सचदेवाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. त्याच्या डोक्याला, हाताला दुखापत झाल्याचं दिसत आहे. त्याने लिहिले, "त्या रात्री माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अशा प्रकारे मी जखमी झालो. याशिवाय त्या रात्रीनंतर मी प्रत्येक रात्र मानसिक धक्क्यात होतो. आज मुंबई किती असुरक्षित आहे हे मला जाणवलं. महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही. गुन्हेगार मोकाट फिरत आहे. या प्रकरणात कायद्याची एकंदर कार्यपद्धती पाहून मी निराश झालो आहे. हे आपल्या सिस्टीमचंच अपयश आहे."
अशा शब्दात अनुज व्यक्त झाला आहे. १४ डिसेंबरच्या रात्री त्याच्यावर हल्ला झाला होता. तो त्याच्या पाळीव श्वानाला घेऊन सोसायटीत फिरत होता. तेव्हा सोसायचीतील एका व्यक्तीने किरकोळ वादातून त्याला जीवघेणी मारहाण केली होती.
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
अनुज सचदेवा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. एमटीव्ही रोडीज शो मध्ये तो सहभागी झाला होता. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं. 'ये रिश्ता क्या कहलाता है','बिदाई','साथ निभाना साथिया','प्रतिज्ञा' यांसारथ्या मालिकांमध्ये तो दिसला. 'छल कपट' वेबसीरिजमध्येही त्याने भूमिका साकारली.