अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसच्या तिसऱ्या सिनेमाची घोषणा
By Admin | Updated: April 15, 2017 00:17 IST2017-04-15T00:17:41+5:302017-04-15T00:17:41+5:30
एनएच10 आणि फिल्लोरीच्या यशानंतर अनुष्का शर्मा जोरात आहे. या दोन चित्रपटानंतर अनुष्काच्या होम प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमा फ्लोरवर येण्यास तयार आहे.

अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसच्या तिसऱ्या सिनेमाची घोषणा
एनएच10 आणि फिल्लोरीच्या यशानंतर अनुष्का शर्मा जोरात आहे. या दोन चित्रपटानंतर अनुष्काच्या होम प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमा फ्लोरवर येण्यास तयार आहे. हा चित्रपट एक लव्हस्टोरी असणार आहे. एनएच10द्वारे अनुष्काने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. शिवाय समीक्षकांनीही या चित्रपटाला मनापासून दाद दिली होती. यानंतर अनुष्का निर्मिती फिल्लोरी या चित्रपटानेही बऱ्यापैकी यश मिळवले. या चित्रपटावर काहीप्रमाणात टीकाही झाली. पण यामुळे नाऊमेद होणाऱ्यांपैकी अनुष्का नाहीच. त्यामुळेच तिने आपल्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अर्थात या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. केवळ हा चित्रपट एक प्रेमकथा असणार असल्याचे तिने स्पष्ट केले. या चित्रपटाचे शूटींग मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहे. यासंदर्भात अनुष्काच्या प्रॉडक्शन कंपनीने एक स्टेटमेंट जारी केले आहे. दोन एकापाठोपाठ एक आलेल्या चित्रपटाच्या यशाने टीम उत्साहित आहे. या उन्हाळ्यात नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे.