तैमुरला दिली या स्टारकिडने मात, केवळ तीन महिन्याच्या या चिमुकल्याचे आहेत लाखो फॉलोव्हर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 07:00 AM2021-05-30T07:00:00+5:302021-05-30T07:00:02+5:30

हा स्टार किड केवळ तीन महिन्याचा असला तरी तो सोशल मीडियावर प्रचंड फेमस झाला असून त्याचे लाखो फॉलोव्हर्स आहेत.

anita hassanandani son aarav reddy is famous star kid on social media | तैमुरला दिली या स्टारकिडने मात, केवळ तीन महिन्याच्या या चिमुकल्याचे आहेत लाखो फॉलोव्हर्स

तैमुरला दिली या स्टारकिडने मात, केवळ तीन महिन्याच्या या चिमुकल्याचे आहेत लाखो फॉलोव्हर्स

googlenewsNext
ठळक मुद्देअनिताच्या मुलाचे नाव आरव रेड्डी असून त्याचे इन्स्टाग्रामवर एक अकाऊंट आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी खूप लोकप्रिय आहे. ती कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकतेच अनिताने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

ती बऱ्याचदा आपल्या मुलासोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तिचा मुलगा केवळ तीन महिन्याचा असला तरी तो सोशल मीडियावर प्रचंड फेमस झाला असून त्याचे लाखो फॉलोव्हर्स आहेत.

अनिताच्या मुलाचे नाव आरव रेड्डी असून त्याचे इन्स्टाग्रामवर एक अकाऊंट आहे. या अकाऊंटद्वारे लाखो लोक त्याला फॉलो करतात. त्याच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंट्चा नेहमीच वर्षाव होतो. 

अनिता हसनंदानीने ९ फेब्रुवारी रोजी आरवला जन्म दिला. रोहित रेड्डीने इंस्टाग्रामवरून आपण बाबा झाल्याची गोड बातमी दिली होती.

तेव्हापासून ते आरवचे फोटो, व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवर तसेच आरवच्या अकाऊंटवर शेअर करत असतात. 

Web Title: anita hassanandani son aarav reddy is famous star kid on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.