अनिल कपूरचा 'झकास' फॅन : फोटो स्टोरी
By Admin | Updated: July 14, 2016 16:44 IST2016-07-14T16:41:37+5:302016-07-14T16:44:11+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्स आणि त्यांच्या फॅन्सच्या क्रेझी कथा, काही किस्सेही आपण ब-याच वेळा ऐकले असतील. अनिल कपूरच्या आयुष्यातही नुकताच असाच एक 'जबरा' पॅन आला होता..

अनिल कपूरचा 'झकास' फॅन : फोटो स्टोरी
>सीएनएक्स एक्स्क्लुझिव्ह
मुंबई, दि. १४ - बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्स आणि त्यांच्या फॅन्सच्या क्रेझी कथा, काही किस्सेही आपण ब-याच वेळा ऐकले असतील. बॉलिवूडचा झकास अभिनेता अनिल कपूर याच्या बाबतीतही असा एक किस्सा नुकताच घडला. अनिल कपूर सध्या '24 सीझन-2' या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून प्रमोनशच्याच निमित्ताने त्याने मुंबई सेंट्रल येथून ट्रेनमधून प्रवास केला आणि त्याची एका 'जबरा' फॅनशी गाठ पडली.
खुद्द अनिल स्टेशनवर आल्याचे कळताच त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सची स्टेशनवर एकच झुंबड उडाली. अनिलची एक झलक पाहता यावी आणि त्याचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करता यावा यासाठी एक फॅन मात्र जीवाची पराकाष्टा करत होता. तो कधी पत्र्यावर चढला तर कधी भिंतीच्या कोप-यावर उभं राहून अनिलची छबी कॅमे-यात कैद करण्याचा प्रयत्न करत होता.
या फॅनची धडपड अनिल कपूरच्याही नजरेस पडली. त्यानं त्याला थांबवण्याचा सल्लाही दिला. जीव धोक्यात घालून अशी धडपड करू नकोस, असेही अनिलने त्या फॅनला सांगितले. तसंच त्याने त्याला खाली उतरण्याचाही सल्ला दिला. मात्र अनिलची एक छबी कॅमे-यात कैद करण्यासाठी आसुसलेला तो फॅन कुणाचंही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. खुद्द अनिलच्या विनंतीनंतरही त्याला फक्त अनिलचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करणंच महत्त्वाचं वाटत होतं.
मग अनिलनंच आपल्या या क्रेझी फॅनला हात देत वर खेचलं. तेव्हा घडली एका जबरा फॅन आणि स्टारची भेट....
यानंतर अनिल नक्कीच आपल्या स्टारला म्हणाला असेल.. एकदम झक्कास.