...अन् प्रेयसीच झाली आई!
By Admin | Updated: December 13, 2015 00:52 IST2015-12-13T00:52:52+5:302015-12-13T00:52:52+5:30
रुपेरी पडद्यावर कुणाला, कुणासोबत, कोणती भूमिका वठवावी लागेल काही सांगता येत नाही. बरं, पडद्यावरच्या या नात्यांना काही लॉजिकही नसते.

...अन् प्रेयसीच झाली आई!
रुपेरी पडद्यावर कुणाला, कुणासोबत, कोणती भूमिका वठवावी लागेल काही सांगता येत नाही. बरं, पडद्यावरच्या या नात्यांना काही लॉजिकही नसते.
एका चित्रपटात नायक सहनायिकेचा भाऊ असतो तर दुसऱ्याच चित्रपटात तो चक्क तिचा नवरा म्हणून प्रेक्षकांसमोर येतो. नायिकांच्या बाबतीतही असेच घडते. कधी नायकाची प्रेयसी म्हणून ती त्याला मिठीत घेते तर कधी थेट आई बनून आर्शीवाद देताना दिसते. पडद्यावरच्या अशाच काही अजब नात्यांची ही गजब कथा...
एकाच नायिकेसोबत नायक आणि मुलाचा रोल साकारणाऱ्यांमध्ये सर्वांत अगोदर नाव येते ते अमिताभ बच्चन यांचे. त्यांच्या तीन अशा नायिका होत्या ज्यांनी त्यांच्यासोबत आधी नायिका व नंतर पडद्यावर त्यांच्या आईची भूमिका केली. ९० व्या दशकात अमिताभ यांचा ‘बरसात की रात’ हा चित्रपट आला होता. शक्ती सामंतच्या या चित्रपटात राखीने एक अंध तरुणीची भूमिका केली होती. काही दिवसानंतर अमिताभ बच्चनचा अजून एक चित्रपट ‘शक्ती’ आला होता. रमेश सिप्पीच्या निर्देशनात बनलेल्या या चित्रपटात राखीने अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका केली. ‘फरार’ आणि ‘बेशर्म’ चित्रपटात शर्मिला टागोर आणि अमिताभची प्रणयरम्य जोडी होती. पुढे मनमोहन देसाईंच्या ‘देशप्रेमी’मध्ये शर्मिलाने बच्चनच्या आईची भूमिका केली. याप्रमाणेच वहीदा रहमानसोबत अमिताभ यांची ‘अदालत’मध्ये जोडी जमली तर यश चोपडाच्या ‘त्रिशूल’मध्ये वहिदाने त्यांच्या आईची भूमिका केली होती. रेखाने ‘जमीन आसमान’ या चित्रपटात संजय दत्तच्या आईची भूमिका केली होती. त्या काळात चर्चा अशी होती की, या चित्रपटात शूटिंगच्या वेळी रेखा आणि संजय दत्त खूपच जवळ आले. रेखाने तर संजय सोबत लग्न करण्याची इच्छा दर्शवून मोठाच धक्का दिला होता. याप्रकारचे एक अजून प्रकरण स्मिता पाटिल आणि अनिल कपूर यांचे राहिले आहे. रमेश सिप्पींच्या ‘शक्ती’च्या क्लायमेक्समध्ये स्मिता पाटिलच्या मुलाच्या भूमिकेत अनिल कपूर दिसले होते. पुढे त्यांनी दोन चित्रपटात स्मिता पाटिलच्या नायकाच्या भूमिकेत काम केले. महेश भट्टच्या निर्देशनात बनलेला ‘ठिकाना’ आणि जेओम प्रकाशच्या ‘आपके साथ’ चित्रपटात ते स्मिता पाटिलचे जोडीदार म्हणून दिसले. या यादीत अजून एक श्रीदेवीचे नाव जूडले आहे. त्यांच्या सोबत हा चमत्कार एकदाच झाला आणि तो देखील रजनीकांतसारख्या सुपर स्टारसोबत. आपल्या करिअरच्या सुरुवातीला श्रीदेवीने एक तामिळ चित्रपटात रजनीकांतच्या सावत्र आईची भूमिका केली होती. काही वर्षानंतर पंकज पराशरच्या निर्दशनात बनलेल्या ‘चालबाज’मध्ये श्रीदेवी डबल रोल मध्ये होती आणि एका रोलमध्ये तिचे नायक रजनीकांत होते.
- anuj.alankar@lokmat.com