अमृताने प्रियांकासोबत धरला पिंगा...
By Admin | Updated: May 1, 2016 02:10 IST2016-05-01T02:10:59+5:302016-05-01T02:10:59+5:30
‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात कल्ला माजविला होता. त्यातील बाजीराव, काशी, मस्तानी या पात्रांनी आपापल्या अभिनयाने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

अमृताने प्रियांकासोबत धरला पिंगा...
‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात कल्ला माजविला होता. त्यातील बाजीराव, काशी, मस्तानी या पात्रांनी आपापल्या अभिनयाने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या चित्रपटातील पिंगा...गं ...पोरी.... या गाण्याने तर चित्रपटालाच चार चाँद लावले. हे गाणे वाजताच कोणी ठेका धरणार नाही, असे चित्रच पाहायला मिळणार नाही. आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने तर चक्क काशीबाई म्हणजेच प्रियंका चोप्रासोबतच पिंगा घातला आहे. बॉलिवूडच्या या तगड्या अभिनेत्रीसोबत पिंगा गं पोरी....या गाण्यावर डान्स करण्यास मिळणे म्हणजे अमृतासाठी नक्कीच अविस्मरणीय क्षण असणार आहे. तसेच, तिच्या चाहत्यांनादेखील लई भारी व अभिमान वाटला असेलच यात शंकाच नाही. अमृताने जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने प्रियंका चोप्रासोबत पिंगा... या गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. प्रियंका या व्हिडीओत आउटफिटस मध्ये असली, तरी अमृताने मात्र मस्त मराठमोळी रूपात झक्कास पिंगा घातला आहे.