'शोले'मधील जयच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्यामुळे लागली त्यांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:10 IST2025-06-14T16:09:47+5:302025-06-14T16:10:26+5:30
Sholey Movie : 'शोले' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका केली होती आणि धर्मेंद्र यांनी वीरूची भूमिका केली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की या भूमिकेसाठी बिग बींना निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.

'शोले'मधील जयच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्यामुळे लागली त्यांची वर्णी
शोले (Sholey Movie) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित चित्रपट आहे. या चित्रपटातील पात्रे आणि संवाद अजूनही खूप आवडतात. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी जय आणि वीरूच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. पण तुम्हाला माहिती आहे का की, या चित्रपटात जयच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन हे पहिली पसंती नव्हती. मात्र, दुसऱ्या अभिनेत्यामुळे अमिताभ बच्चन यांना ही भूमिका मिळाली.
खरेतर, शोलेमध्ये वीरूची भूमिका साकारणारे बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांनी खुलासा केला होता की, त्यांनी १९७५ मध्ये रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन यांना जयची भूमिका मिळवून देण्यात मदत केली होती. धर्मेंद्र यांनी असेही सांगितले की, यापूर्वी ही भूमिका शत्रुघ्न सिन्हा यांना ऑफर करण्यात आली होती, परंतु नंतर धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांचे नाव शिफारस केले, त्यानंतर बिग बींना ही भूमिका मिळाली.
शोलेसाठी धर्मेंद्र यांनी बिग बींची केलेली शिफारस
एएनआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान धर्मेंद्र म्हणाले, "'हे आधीच सांगितले गेले आहे. हो, मी त्यांची शिफारस केली होती, असे मी म्हणत नाही की माझ्यामुळे त्यांना (अमिताभ बच्चन) ही भूमिका मिळाली. अमिताभ साहेब मला भेटायला यायचे, ते माझ्या शेजारी बसायचे. म्हणून मी रमेश सिप्पीजींना सांगितले की हा एक नवीन मुलगा आहे, त्यांच्या आवाजावरून वाटते की खूप चांगले काम करेल. मला त्यांची आतून असलेली इच्छा, स्वतःवर प्रेम करण्याचे सौंदर्य आवडले, मी त्याला घेण्यास सांगितले.'"