ललिता पवारना 100व्या जयंतीनिमित्त अमिताभ बच्चन यांची आदरांजली
By Admin | Updated: April 19, 2016 16:41 IST2016-04-19T16:41:21+5:302016-04-19T16:41:21+5:30
ललिता पवार या प्रचंड ताकदीच्या आणि बहुश्रूत कलाकार होत्या, अशा शब्दांमध्ये अमिताभ बच्चन यांनी ललिता पवार यांना आदरांजली वाहिली आहे

ललिता पवारना 100व्या जयंतीनिमित्त अमिताभ बच्चन यांची आदरांजली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - ललिता पवार या प्रचंड ताकदीच्या आणि बहुश्रूत कलाकार होत्या, अशा शब्दांमध्ये अमिताभ बच्चन यांनी ललिता पवार यांना आदरांजली वाहिली आहे. पवार यांची आज जन्मशताब्धी आहे.
पवार यांचा अभिनय सगळ्यांपेक्षा उठून दिसायचा असे ट्विट अमिताभनी केलं आहे. दो ऑर दो पाँच, बाँबे टू गोवा, नास्तिक, मंझिल, दो अंजाने आणि आनंदसारख्या चित्रपटांमधून अमिताभ व ललिता पवार यांनी एकत्र काम केले होते.
ललिता पवार यांचा जन्म नाशिकमधला. राजा हरीश्चंद्र या सिनेमामधून वयाच्या नवव्या वर्षी ललिता पवार यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कजाग सासूची भूमिका अनेकवेळा करणाऱ्या व गाजवणाऱ्या ललिता पवार यांना 1961 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
T 2230 - 100 th birth Anniversary of late Lalita Pawar ji .. dynamic, versatile with stand out performances !! pic.twitter.com/LAWKtu8sAG— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 18, 2016