रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:13 IST2025-04-30T13:12:18+5:302025-04-30T13:13:44+5:30
रणबीर कपूरचं नाव आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. अमिषा पटेलचंही यामध्ये नाव आहे.

रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
अभिनेता रणबीर कपूरचं (Ranbir Kapoor) नाव आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, आलिया भटसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना त्याने डेट केलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबतही त्याचे फोटो लीक झाले होते. अखेर २०२२ साली त्याने आलिया भटशी लग्न केलं. पण तुम्हाला माहितीये का रणबीरने डेट केलेल्या अभिनेत्रींच्या यादीत अमिषा पटेलचंही नाव आहे. अमिषा पटेल (Amisha Patel) खरोखरंच रणबीरला डेट करत होती का? यावर तिने आता उत्तर दिलं आहे.
रणबीर कपूर ७ वर्ष मोठ्या अमिषा पटेलला डेट करत होता अशी एकेकाळी चर्चा रंगली होती. आता इतक्या वर्षांनंतर अमिषाने त्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. 'फिल्मी मंत्रा'ला दिलेल्या मुलाखतीत अमिषा म्हणाली, "एक काळ होता जेव्हा आम्ही अनेक इव्हेंट्स, पार्ट्यांमध्ये सोबत असायचो. आरके बंगला असो किंवा त्याच्या घरी मी पार्टीसाठी जायचे. कधी कपूर कुटुंबाचं फंक्शन असायचं तर कधी वर्ल्ड कप मॅच बघायला गेलो तेव्हाचेही आमचे फोटो व्हायरल झाले होते. मनीष मल्होत्रा फॅशन शोही आम्ही केला होता. माझे आई-वडील आणि ऋषी कपूर यांची चांगली ओळख होती. पण मी आणि रणबीर काही रिलेशनशिपमध्ये नव्हतो."
"तो खूप चांगला मुलगा आहे. आमचं छान ट्युनिंग जुळतं. तो क्युट आहे. तो मला नेहमी विचारायचा की कहो ना प्यार है, गदर, हमराज... तू इतकं यश कसं हँडल केलंस. तो स्वत: इतक्या मोठ्या कुटुंबातून आला आहे तरी तो मला असं विचारायचा इतका तो डाऊन टू अर्थ आहे. आम्ही फक्त बरेचदा भेटायचो त्यामुळे आम्ही रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आहे अशा अफवा पसरवल्या गेल्या. त्यात काहीही तथ्य नव्हतं."
अमिषा पटेल सध्या ४९ वर्षांची असून आजही कमालीची सुंदर आणि फिट दिसते. नुकतीच ती 'गदर २' मध्ये झळकली. सनी देओलसोबत तिची जादू पुन्हा पडद्यावर दिसली. सिनेमा ब्लॉकबस्टर होता.