मल्लिकाला व्हायचंय आमीरची पत्नी
By Admin | Updated: May 1, 2015 12:13 IST2015-05-01T12:07:55+5:302015-05-01T12:13:17+5:30
अभिनयापेक्षा बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहणा-या अभिनेत्री मल्लिका शेरावतला आता आमीर खानची पत्नी होण्याचे वेध लागले आहेत.

मल्लिकाला व्हायचंय आमीरची पत्नी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - अभिनयापेक्षा बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहणा-या अभिनेत्री मल्लिका शेरावतला आता आमीर खानची पत्नी होण्याचे वेध लागले आहेत. ख-या आयुष्यात आमीर व किरण राव यांचा सुखाचा संसार सुरु असून मल्लिकाला मोठ्या पडद्यावर आमीर खानच्या पत्नीची भूमिका साकारायची आहे. दंगल या सिनेमासाठी मल्लिकाने आमीरच्या पत्नीच्या भूमिकेसाठी ऑडिशनही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुस्तीपटू महाविरसिंह फोगट यांच्या जीवनावर आधारित 'दंगल' या सिनेमात आमीर खान हा फोगट यांची भूमिका साकारणार आहे. फोगट यांनी त्यांच्या मुलींनाही कुस्तीचे प्रशिक्षण दिले होते. चित्रपटात आमीरच्या मुलीची भूमिका कोण साकारणार यासाठी ऑडीशन जोरात सुरु आहे. अभिनेत्री मल्लिका शेरावतनेही या चित्रपटासाठी ऑडिशनसाठी हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे मल्लिका ऑडीशनसाठी एकदम साध्या वेशभूषेत गेली होती. तिने मेक अपही केले नाही. या चित्रपटात हरियाणवी भाषेचा वापर जास्त होणार असून मल्लिकाने अगदी सहजपणे ही भाषा बोलत ऑडिशन पूर्ण केले. पण मल्लिकाने आमीरच्या मुलीसाठी नव्हे तर आमीरच्या पत्नीची भूमिका निभावण्यासाठी ऑडिशन दिले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप मल्लिकाला घ्यायचे की नाही यावर निर्णय झालेला नाही.