अमर अकबर अँथनी सिनेमा नॉन्सेसिकल होता - शाहरूखची मचमच
By Admin | Updated: November 7, 2014 17:51 IST2014-11-07T17:51:34+5:302014-11-07T17:51:34+5:30
शाहरूख खानने जया बच्चनना उलट उत्तर करून आणखी एक वाद निर्माण केला आहे.

अमर अकबर अँथनी सिनेमा नॉन्सेसिकल होता - शाहरूखची मचमच
>काही ना काही निमित्तानं सतत चर्चेत राहणा-या शाहरूख खानने जया बच्चनना उलट उत्तर करून आणखी एक वाद निर्माण केला आहे. शाहरूऱ खानचा हॅपी न्यू इयर हा सिनेमा म्हणजे मूर्खपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली होती. वस्तुत: या चित्रपटात अभिषेक बच्चन याचीही भूमिका आहे आणि जया बच्चन या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. परंतु, शांत राहून मान राखील तो शाहरूख कसला, त्याने जया बच्चन यांना प्रत्युत्तर करताना अमिताभ बच्चन यांचा तुफान गाजलेला अमर अकबर अँथनी हा सिनेमाही मूर्खपणाचा कळस होता अशी टीका झाली होती, अशी टिप्पणी केली. शाहरूखला स्वत:च्या मुलाप्रमाणे जया बच्चन मानतात आणि दोन्ही कुटुंबांमध्ये अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. अर्थात या शाब्दिक टिप्पणींमुळे दोघांमध्ये वितुष्ट आलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणारा मेसेज शाहरूखला पाठवल्याचंही वृत्त आहे. या दोन्ही कुटुंबांना जवळून ओळखणा-या हितचिंतकांनी मात्र, हे प्रकरण एवढं गंभीर नसल्याचं व काहीजण पराचा कावळा करत असल्याचं म्हटलं आहे.