मजा-मस्तीबरोबरच संदेशपूर्ण ‘पोश्टर गर्ल’
By Admin | Updated: February 6, 2016 02:34 IST2016-02-06T02:34:43+5:302016-02-06T02:34:43+5:30
चित्रपट आपल्याला स्वप्न पाहायला लावतात. चित्रपटांना स्वप्नसृष्टी म्हणणे चुकीचे ठरू नये. तास-दोन तास का होईना

मजा-मस्तीबरोबरच संदेशपूर्ण ‘पोश्टर गर्ल’
चित्रपट आपल्याला स्वप्न पाहायला लावतात. चित्रपटांना स्वप्नसृष्टी म्हणणे चुकीचे ठरू नये. तास-दोन तास का होईना, पण आपल्याला वास्तवाच्या पलीकडे घेऊन जाणारे, आपल्या कल्पनांना चंदेरी पडद्यावर उतरविणारे, क्षणभरासाठी स्वत:ला विसरायला भाग पाडणारे हे चित्रपट खरोखरच ‘मूडफ्रेशनर’ असतात.
पण त्याबरोबरच मनोरंजनातून आपल्या अवतीभवती असणारे दाहक विषय समोर आणण्याचे कामही चित्रपटांच्या माध्यमातून करता येते. हाच विचार ठेवून, स्त्रीभ्रूणहत्या आणि महिलांप्रति असलेला एकंदर मागासलेला दृष्टिकोन यांविषयी विनोदाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न ‘पोश्टर गर्ल’ या सिनेमाच्या माध्यमातून मांडला आहे.
‘पोश्टर गर्ल’चे दिग्दर्शक समीर पाटील, निर्माते पुष्पांग गावडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, संदीप पाठक, लेखक हेमंत ढोमे यांनी नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली. शूटिंगच्या गमतीजमती, विषयाचे वेगळेपणे आणि एकत्र काम करण्याची मजा अशी सगळी धमाल या वेळी झालेल्या चर्चेतून समोर आली.
पुरुषांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्री म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू अशी साधारणत: वृत्ती आपल्या समाजात आढळून येते. त्यावर मनोरंजानातून भाष्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला, असे दिग्दर्शक समीर पाटील यांनी सांगितले. माझ्यादृष्टीने मी आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा फार वेगळी भूमिका असल्याचे अभिनेता अनिकेत विश्वासराव म्हणाला.
माझ्या आईपासून प्रेरित होऊन मी हा चित्रपट लिहिला. हा चित्रपट पाहून जर लोकांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला किंवा किमान त्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले, तरी आमचा चित्रपट सफल होईल, असे लेखक अभिनेता हेमंत ढोमे म्हणाला. दणकेबाज रूपाली
‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटानंतर मी एका ग्रामीण मुलीची भूमिका करतेय. इतक्या सशक्त स्त्री-भूमिका क्वचितच लिहिल्या जातात. गावात मी एकटी मुलगी असल्यामुळे संपूर्ण गावाच्या नजरेचा मला सामना कराव लागतो. पण त्याला उत्तर म्हणून ‘हात खाली, नजर खाली, नाव लक्षात ठेवायचं रूपाली’ अशी ती दणकेबाज आणि रोखठोक आहे.
- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्रीकथा ऐकताच प्रेमात
हेमंतने जेव्हा मला चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हा यामध्ये भूमिका न करण्याचा प्रश्नच नव्हता. कथा ऐकताच ‘भारतराव झेंडे’ कसा असणार, यावर मी क ाम करू लागलो. माझ्यासमोर एवढ्या गंभीर विषयाला एकदम वेगळ्या पद्धतीने त्याने टच दिला आहे. सर्व भूमिकांना एकसारखे महत्त्व त्याने दिले आहे. हे मला सर्वांत जास्त आवडले. सर्व मित्रांसोबत काम करायला मिळणार म्हणूनही मी खूप खूश होतो.
- जितेंद्र जोशी, अभिनेता