आलिया, श्रध्दाचा 'जुडवा २' मध्ये वरुनसोबत रोमॅन्स?
By Admin | Updated: June 5, 2016 23:54 IST2016-06-05T23:27:41+5:302016-06-05T23:54:31+5:30
१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जुडवा' या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'जुडवा २'या चित्रपटामध्ये सलमान खानची जागा वरूण धवन घेणार आहे. तो पहिल्यांच दुहेरी भुमीका करणार आहे.

आलिया, श्रध्दाचा 'जुडवा २' मध्ये वरुनसोबत रोमॅन्स?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : दिलीपकुमारच्या ‘राम और श्याम’नंतर आतापर्यंत जुळ्यांच्या अनेक कथा पडद्यावर आलेल्या आहेत. त्यापैकी हेमामालिनीचा ‘सीता और गीता’ आणि श्रीदेवीचा ‘चालबाज’ बराच गाजला होता. डेव्हीड धवनने सलमान खानला घेऊन बनवलेल्या ‘जुडवा’ या चित्रपटालाही मोठेच यश मिळाले होते आता १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जुडवा' या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'जुडवा २'या चित्रपटामध्ये सलमान खानची जागा वरूण धवन घेणार आहे. तो पहिल्यांच दुहेरी भुमीका करणार आहे.
मूळ ‘जुडवा’ मध्ये सलमानबरोबर करिश्मा आणि रंभा झळकल्या होत्या. त्यामधील ‘टन टना टन टन टन तारा’ हे करिश्माबरोबरचे आणि ‘ईस्ट ऑर वेस्ट इंडिया इज द बेस्ट’ हे रंभाबरोबरचे गाणे हिट झाले होते. फिल्मफेअर डॉट कॉमच्या वृत्तानुसार 'जुडवा २' चित्रपटात वरुणबरोबर श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट दिसण्याची शक्याता आहे.
'जुडवा'मध्ये सलमान खान, करिश्मा कपूर आणि रंभा यांच्या भूमिका होत्या. करिश्मा कपूरची जागा श्रद्धा कपूर घेईल, आणि रंभाच्या जागेवर आलियाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १९९७मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जुडवा' या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते. 'जुडवा२'चे देखील दिग्दर्शन डेव्हिड धवनच करणार आहेत.
वरूण धवन आणि श्रद्धा कपूर ही जोडी २०१५ मध्ये आलेल्या 'एबीसीडी २'या चित्रपटामध्ये झळकली होती तर आलिया-वरुण स्टुडंट ऑफ दि इयर, हम्टी शर्मा की दुलहनिया मध्ये एकत्र दिसले होते. तर या जोडीचा 'बद्रिनाथ की दुल्हनिया' चे चित्रिकरण सुरु झाले आहे.
(वरुण आणि आलियाच्या 'बद्रिनाथ की दुल्हनिया'चा फर्स्ट लूक रिलीज)