आलिया म्हणते मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये
By Admin | Updated: June 7, 2016 15:40 IST2016-06-07T15:40:58+5:302016-06-07T15:40:58+5:30
अभिनेत्री आलिया भट लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून तिने स्वत: याची कबुली दिली आहे

आलिया म्हणते मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये
>मुंबई, दि. 07 - अभिनेत्री आलिया भटचे नाव अनेकवेळा सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले जाते. पण ती सिद्धार्थसोबत नसून दुस-याच कोणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. स्वत: आलिया भटने आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे.
सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, आजची पिढी ही लग्नापेक्षा लिव्ह इनकडे जास्त आकर्षित होते. लग्न करायचे की लिव्ह इनमध्ये राहायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मला कोणी विचारले तर मला लिव्ह इनमध्ये राहण्यात काहीही गैर वाटत नाही. सध्या मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. मी माझ्या बहिणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे असे मजेशीर उत्तर आलियाने दिलेले आहे.