'कथथी'च्या रिमेकमध्ये अक्षय दिसणार?
By Admin | Updated: November 23, 2015 20:07 IST2015-11-23T19:45:03+5:302015-11-23T20:07:03+5:30
नॉनस्टॉप चित्रपटांमध्ये काम करणारा बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आता तमीळ चित्रपट 'कथथी'चा बॉलीवूडमध्ये रिमेक बनविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

'कथथी'च्या रिमेकमध्ये अक्षय दिसणार?
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - नॉनस्टॉप चित्रपटांमध्ये काम करणारा बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आता तमीळ चित्रपट 'कथथी'चा बॉलीवूडमध्ये रिमेक बनविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
दरम्यान, याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारने 'कथथी' या चित्रपटाच्या संपर्कात असलो, तरी अद्याप या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करायचे की नाही याबाबत निर्णय घेतला नसल्याचे मिडीयाशी बोलताना सांगितले.
'कथथी' हा तमीळ चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट कार्पोरेट अतिक्रमणामुळे शेतक-यांच्या आत्महत्या या विषयावर आधारित असून याचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. यामध्ये तमीळ स्टार विजय याने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. तसेच विजयसोबत अभिनेत्री म्हणून समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता निल नितीन मुकेश यांचाही यामध्ये समावेश आहे. दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास यांनी अभिनेता अक्षय कुमारसोबत 'हॉलीडे' या चित्रपटात काम केले आहे.