स्टंटमन राजू यांच्या अपघाती निधनानंतर अक्षयचा मोठा निर्णय, ७०० स्टंटमनसाठी पुढे सरसावला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:02 IST2025-07-18T10:02:09+5:302025-07-18T10:02:30+5:30
अक्षयने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो केवळ ऑनस्क्रीन नव्हे तर रिअल लाईफमध्येही 'हिरो' आहे.

स्टंटमन राजू यांच्या अपघाती निधनानंतर अक्षयचा मोठा निर्णय, ७०० स्टंटमनसाठी पुढे सरसावला!
Akshay Kumar Raju Stuntman Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टंट कलाकार एस. एम. राजू यांचा १३ जुलैला रविवारी एका स्टंटदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तमिळ चित्रपटातील अत्यंत जोखमीचे असे हे दृश्य शूट करताना त्यांनी जीव गमावला. एस. एम. राजू यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. या संपुर्ण घटनेनंतर बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारनं मोठा निर्णय घेतला आहे.
स्टंट करताना अनेकदा जीवाची बाजी लावणाऱ्या या कलाकारांना फारशी प्रसिद्धी किंवा मोठा पैसा मिळत नाही. मात्र, अक्षय कुमार याला या गोष्टीचं नेहमीच भान असतं. अक्षय कुमारने चित्रपटसृष्टीतील स्टंटमन आणि स्टंटवुमन यांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. त्याने भारतातील जवळपास ७०० स्टंटमन आणि स्टंटवुमन यांचे विमा संरक्षण (Akshay Kumar Insurance Stuntmen) केले आहे. हे पाऊल उचलत अक्षयने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो केवळ ऑनस्क्रीन नव्हे तर रिअल लाईफमध्येही 'हिरो' आहे. त्याच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर आणि चित्रपटसृष्टीतूनही भरभरून कौतुक केलं जात आहे.
प्रसिद्ध स्टंट प्रोफेशनल विक्रम सिंह दहिया यांनी अक्षयच्या या उपक्रमाबद्दल माहिती दिली. "अक्षय यांच्यामुळे बॉलिवूडमधील जवळपास ६५० ते ७०० स्टंटमन आणि ॲक्शन क्रू सदस्य आता विम्याद्वारे संरक्षित झाले आहेत. पॉलिसीमध्ये ५ ते ५.५ लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध आहे. दुखापत सेटवर झाली असो वा सेटबाहेर, या पॉलिसीद्वारे संरक्षण मिळेल", असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, एस. एम. राजू हे तमिळ इंडस्ट्रीतील एक अनुभवी स्टंट कलाकार होते. ते अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत होते.
Stunt driver Mohan raj fatal accident at #Vettuvam shooting spot .
— Prashanth Rangaswamy (@itisprashanth) July 14, 2025
(Raw Unedited Footage) pic.twitter.com/D7hF85NWWY
कशी घडली दुर्घटना?
स्टंटमॅन राजू उर्फ मोहनराज एक SUV कार चालवत होते. जी एका रॅपवरून चालवताना पुढे जाऊन पलटली. त्यानंतर त्यांची कार खाली कोसळली आणि पुढील भाग जमिनीवर आदळला. या व्हिडिओत राजूला कारमधून बाहेर काढताना दिसत आहे. हा अपघात इतका भयंकर होता की राजू यांचा जागीच मृत्यू झाला.