‘अकिरा’चा अ‍ॅक्शन पॅक टीजर आउट!

By Admin | Updated: July 2, 2016 03:08 IST2016-07-02T03:08:44+5:302016-07-02T03:08:44+5:30

दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांच्या ‘गझनी’ चित्रपटानंतर आता त्यांचा ‘अकिरा’ हा चित्रपट लवकरच येणार आहे.

Akira's Action Pack Teaser Out! | ‘अकिरा’चा अ‍ॅक्शन पॅक टीजर आउट!

‘अकिरा’चा अ‍ॅक्शन पॅक टीजर आउट!


दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांच्या ‘गझनी’ चित्रपटानंतर आता त्यांचा ‘अकिरा’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा ही एकदम अ‍ॅक्शन लूकमध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा अ‍ॅक्शन पॅक टीजर आउट करण्यात आला आहे. या व्हिडीओची आमीर खानच्या गझनीमधील स्टंट्ससह सुरुवात होते. त्यानंतर सोनाक्षी सिन्हाचे काही स्टंट्स दाखविण्यात येतात. मुरुगादोससोबत सोनाक्षीचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. ‘हॉलीडे’नंतर हा दुसरा चित्रपट आहे. २ सप्टेंबरला चित्रपट रीलिज होईल.

Web Title: Akira's Action Pack Teaser Out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.