आईसाठी अजय देवगणने अर्ध्यावर सोडले शुटिंग
By Admin | Updated: January 24, 2017 16:34 IST2017-01-24T15:49:47+5:302017-01-24T16:34:54+5:30
शिवायच्या यशानंतर अजय देवगणने गेल्या आठवड्यात मिलन लूथरियाच्या बादशाहो चित्रपटाते शुटिंग सुरू केले होते.

आईसाठी अजय देवगणने अर्ध्यावर सोडले शुटिंग
नवी दिल्ली, दि. 24 - 'शिवाय' सिनेमाच्या यशानंतर अजय देवगणने गेल्याच आठवड्यात मिलन लूथरियाच्या 'बादशाहो' सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. राज्यस्थानमधील जोधपूर येथे या सिनेमाचे शुटिंग सुरू आहे. या सिनेमामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. मात्र अचानक अजयला अर्ध्यातच सिनेमाचे शुटिंग सोडावे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अजयच्या आईच्या प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने मुंबईला यावे लागले. यामुळे मिलनला सिनेमाचे शुटिंग थांबवावे लागले. गेल्या काही दिवसांपासून अजयची आई सतत आजारी पडत आहे. पण शनिवारी त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना सांताक्रुझ येथील खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. अजयला आईबाबतची माहिती मिळताच शुटिंग थांबवण्याची विनंती त्याने सिनेमाच्या टीमला केली. यानंतर तो थेट मुंबईत दाखल झाला.
(अजय देवगण बोलणार मराठी....या कार्यक्रमात काजोलसह हजेरी)
दरम्यान, अजय देवगणचा बादशाहो हा इम्रान हाश्मीसोबतचा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी त्याने 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई'मध्ये एकत्र काम केलं होतं. तर अजयचा मिलनसोबतचा हा चौथा सिनेमा आहे.
सप्टेंबर 2017मध्ये बादशाहो बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. अजय-इम्रान हाश्मीसह इलियाना डिक्रूज या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर सनी लिओनीचं या सिनेमात आयटम साँग पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे.