अजय देवगणच्या 'तान्हाजी' सिनेमाचा ६ वर्षांनी येणार सीक्वल? अभिनेता म्हणाला- "गोष्ट अजून संपलेली नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 11:19 IST2026-01-11T11:19:09+5:302026-01-11T11:19:44+5:30
'तान्हाजी' सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्याने सिनेमाच्या सीक्वलची हिंट दिली आहे.

अजय देवगणच्या 'तान्हाजी' सिनेमाचा ६ वर्षांनी येणार सीक्वल? अभिनेता म्हणाला- "गोष्ट अजून संपलेली नाही..."
अजय देवगणचा 'तान्हाजी' सिनेमा प्रचंड गाजला. २०२० साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमातून शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली होती. अजय देवगणने सिनेमात तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. आता या सिनेमाच्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या आहेत.
'तान्हाजी' सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्याने सिनेमाच्या सीक्वलची हिंट दिली आहे. 'तान्हाजी' सिनेमाचं एक स्केच अजय देवगणने शेअर केलं आहे. "गड आला पण सिंह गेला... पण कथा अजून संपलेली नाही", असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अजय देवगणच्या या पोस्टमुळे 'तान्हाजी' सिनेमाचा सीक्वल येणार असल्याचं बोललं जात आहे.

'तान्हाजी' सिनेमा ओम राऊतने दिग्दर्शित केला होता. या सिनेमात काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. शरद केळकरने सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ज्याचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. तर सैफ अली खान उदयभानच्या भूमिकेत होता. अजिंक्य देव, देवदत्त नागे, शशांक शेंडे, देवेंद्र गायकवाड, कैलास वाघमारे, धैर्यशील घोलप हे मराठी कलाकारही झळकले होते.