अजय देवगण आणि रोहित शेट्टीचा पुन्हा एकदा 'गोलमाल'
By Admin | Updated: March 14, 2017 14:01 IST2017-03-14T13:59:38+5:302017-03-14T14:01:41+5:30
रोहित शेट्टीचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेता अजय देवगणने आगामी चित्रपट 'गोलमाल'मधील स्टारकास्टचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत

अजय देवगण आणि रोहित शेट्टीचा पुन्हा एकदा 'गोलमाल'
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेता अजय देवगणने आगामी चित्रपट 'गोलमाल'मधील स्टारकास्टचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो शेअर केला आहे. वाढदिवस गोलमाल चित्रपटाप्रमाणे मजेशीर असला पाहिजे, वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहित असं ट्विट अजय देवगणने केलं आहे. या फोटोच्या निमित्ताने का होईना चित्रपटाची स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे खूप दिवसांनंतर तब्बूला विनोदी भूमिकेत पाहण्याची संधी मिळणार आहे. हेरा फेरी चित्रपटानंतर तब्बूला विनोदी भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. परिणीती चोप्राही या चित्रपटात असणार आहे.
गोलमाल सिरीजमधील हा चौथा भाग असून यानिमित्ताने पुन्हा एकदा रोहित शेट्टी आणि अजय देवगण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. पहिल्या गोलमाल चित्रपटापासून दोघे एकत्र आहेत. 2006 साली आलेला गोलमाल चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यानंतर त्याचे सिक्वेलही करण्यात आले. चित्रपटात अजय देवगणसोबत चित्रपटातील गोलमाल टीम पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल कपूर पुन्हा एकदा विनोदी भूमिकेतून मनोरंजन करताना दिसणार आहेत.
Birthdays should be mad fun and glorious...a lot like our Golmaal family. Happy Birthday Rohit! pic.twitter.com/ZmXH5mR3Cx— Ajay Devgn (@ajaydevgn) March 14, 2017
रोहित शेट्टीचा दिलवाले शेवटचा चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला. तर अजय देवगणचा शिवाय अपेक्षेप्रमाणे कमाई करु शकला नाही. गोलमालच्या निमित्ताने दोघेही हिट चित्रपटाची अपेक्षा करत आहेत. दिवाळीत हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.