"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:01 IST2025-07-09T10:01:06+5:302025-07-09T10:01:45+5:30
'धूमधाम' गाण्यानंतर अजय देवगणची आणखी एक कॉमेडी डान्स स्टेप

"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
अजय देवगणच्या आगामी 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2) सिनेमाचं शूट पूर्ण झालं आहे. स्कॉटलंडमध्ये सिनेमाचं शूट झालं आहे. सिनेमात अजय देवगणसोबत पहिल्यांदाच मृणाल ठाकुर झळकणार आहे. नुकतंच सिनेमातील पहिलं गाणं 'पहला तू' हे रिलीज झालं. यात अजय आणि मृणालचे डान्स स्टेप्स त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. गाण्याची कोरिओग्राफी पाहून अनेकांना हसू अनावर झालं. नेटकऱ्यांनी त्यांचा डान्स पाहून एकापेक्षा एक कमेंट्स केल्या आहेत.
अजय देवगणला चांगला डान्सर करता येत नाही हे सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्या आधीच्या 'धूम धाम' गाण्यातही त्याने केलेली स्टेप खूप व्हायरल झाली होती. तर आता 'सन ऑफ सरदार २' मधील 'पहला तू दुजा तू' या गाण्यात अजय आणि मृणालची स्टेप खूपच विनोदी आहे. शरीराची फारशी हालचाल न करता फक्त एकमेकांचा हात हातात घेऊन ते एक दोन तीन चार अशा प्रकारे बोटांची हालचाल करत आहेत. मागे स्कॉटलंड लेकचा नजारा आहे. अजय देवगण सरदार लूकमध्ये दिसतोय. तर मृणालही वेस्टर्न लूकमध्ये गोड दिसत आगे. मात्र त्यांच्या डान्सची नेटकरी खिल्ली उडवत आहेत.
'नवीन स्टेप आली', 'इतकी अवघड स्टेप कशी केली?', 'या सिनेमामुळे मृणालची चांगली अभिनेत्री असल्याची प्रतिमा खराब होणार नाही अशी आशा आहे', 'कोण आहे हा टॅलेंटेड कोरिओग्राफर?', 'काय आहे हे?','अजयला डान्ससाठी फक्त हाताची बोटंच पुरेशी आहेत' अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
'सन ऑफ सरदार २' २५ जुलै रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वीच आला होता. चाहत्यांना आता ट्रेलरची उत्सुकता आहे. सिनेमात संजय दत्त, नीरु बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत यांचीही भूमिका आहे.