नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:06 IST2025-11-17T18:05:40+5:302025-11-17T18:06:04+5:30
ऐश्वर्याने पोस्टमधून व्यक्त केली खंत

नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
टीव्हीवरील चर्चेतलं कपल ऐश्वर्या शर्मा आणि नील भट यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची धक्कादायक माहिती चाहत्यांना मिळाली. ऐश्वर्या आणि नील बिग बॉसमध्ये दिसले होते. अंकिता लोखंडे-विकी जैन या जोडीसह नील-ऐश्वर्याची जोडीही गाजली होती. पण आता दोघंही वेगळे होत असल्याच्या चर्चा आहेत. इतकंच नाही तर काही महिन्यांपासून ते वेगळेच राहत आहेत. या सगळ्या चर्चांदरम्यान काहींनी ऐश्वर्याला ट्रोल केलं. यावरुन आता तिने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
ऐश्वर्याने शर्माने पोस्टमध्ये लिहिले, 'लोक माझ्या आयुष्याबाबतीत स्वत:चीच मतं बनवत आहेत. मी केलंय का, कोण आहे मी? हे सगळं जाणून न घेता काहीही बोलत आहेत. काही लोक तर कर्मा आहे असंही म्हणत आहेत. मात्र यावर विश्वास ठेवण्यापूर्वी माझ्यासोबत काम केलेल्यांना माझ्याबद्दल विचारुन पाहा. माझ्या कोस्टार्सना विचारा, निर्मात्यांना विचारा. सेटवरील कोणत्याही व्यक्तीला विचारा की मी कधी कोणाला त्रास दिलाय का कोणाला दुखवलं आहे, अपमान केला आहे? एकदाही नाही. मी सेटवर फक्त प्रोफेशनलिज्म मेटेंन ठेवलं."
तिने पुढे खंत व्यक्त करत लिहिले, "जेव्हापासून माझा साखरपुडा झाला आहे तेव्हापासून मीच विनाकारण ट्रोल होत आले आहे. ही गोष्ट मी हसण्यावर नेली. पण कोणीही त्याबद्दल बोललं नाही. कोणी म्हटलं नाही की माझ्यासोबत चुकीचं होत आहे. ही गोष्ट कोणी कधीच का पाहिली नाही? याहून वेगळं म्हणजे अनोळखी लोक मला मेसेज पाठवत आहेत, युट्यूब लिंक पाठवत आहेत जिथे जिथे विनाकारण माझं नाव जोडलं जात होतं. मी कोणाला त्रास दिला, कोणाच्या कानाखाली मारली आणि कोणासोबत गैरवर्तन केलं असं लिहिलं होतं. जेव्हा की असं काहीच घडलं नव्हतं."

"मी नेहमीच शांत बसले पण याचा अर्थ हा नाही की मी चुकीची आहे. मी स्पष्ट सांगते की मी आयुष्यात कधीच कोणाला त्रास दिला नाही. लोक आपल्या फायद्यासाठी खोटं पसरवतात आणि त्यांनी आपल्या कर्माकडे बघितलं पाहिजे. तुम्ही मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलता पण कोणाला चुकीचं ठरवण्याआधी एकदा विचार कर करा. काही लोकांना शांत बसणं योग्य वाटतं ज्यात मीही आहे. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही काहीही बोलाल. मी माझ्या स्वाभिमानासाठी स्वत: उभी राहीन."