कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 09:18 IST2025-05-23T09:18:05+5:302025-05-23T09:18:33+5:30

ऐश्वर्या राय बच्चनने दुसऱ्या दिवशी तिच्या अनोख्या ड्रेसमुळे कान्समध्ये सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी ऐश्वर्याने ड्रेसवर लिहिलेला भगवद्गीतेचा खास श्लोक चर्चेत राहिला

Aishwarya rai bachchan at cannes film festival new look with bhagvadgita shlok photos | कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती

कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ ची चांगलीच उत्सुकता आहे. या फेस्टिव्हलमध्ये जिची सर्वांना उत्सुकता होती ती अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या रायने (aishwarya rai bachchan) तिच्या उपस्थितीत कान्सच्या पहिल्या दिवशी पांढरी साडी आणि सिंदूर लावून कान्समध्ये सर्वांचं लक्ष वेधलं. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसऱ्या दिवशीही ऐश्वर्याने सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी ऐश्वर्याने गाउनवर लिहिलेला भगवद्गीतेचा खास श्लोक सर्वांचं लक्ष वेधून गेला. काय लिहिलं होतं?

ऐश्वर्याच्या ड्रेसची चर्चा

कान्समध्ये आल्यावर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या जेव्हा सहभागी झाली होती तेव्हा तिचा डिझायनर गौरव गुप्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. याशिवाय ऐश्वर्याच्या ड्रेसचा तपशील गौरवने सांगितला. ऐश्वर्याने ड्रेसवर भगवद्गीतेचा एक श्लोक लिहिला आहे. || कर्मण्येवाधिकारस्ते फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि || असा श्लोक ऐश्वर्याच्या गाउनवर लिहिला आहे. त्यामुळे कान्सच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे.


७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर गौरव गुप्ताच्या कस्टम कॉउचर ड्रेसमध्ये ऐश्वर्या राय खूप मनमोहक दिसतेय. अभिनेत्रीने तिचा लूक 'हेयरेस ऑफ क्लॅम' या थीमवर ठेवला. अभिनेत्रीच्या ब्रोकेड केपबद्दल बोलायचे झाले तर, ब्रोकेड वर्कवर सोनेरी आणि चांदीच्या धाग्यांनी केलेलं भरतकाम केलेले आहे. कान्स  फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्याही दिसली.  एकूणच बॉलिवूडची राणी ऐश्वर्या कान्समध्ये तिच्या उपस्थितीने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.

Web Title: Aishwarya rai bachchan at cannes film festival new look with bhagvadgita shlok photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.