'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:55 AM2024-05-09T11:55:51+5:302024-05-09T12:12:52+5:30

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका न आवडणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकर यांचं खणखणीत उत्तर. काय म्हणाल्या बघा (aishwarya narkar)

Aishwarya Narkar reply to the user who said dont like satvya mulichi satvi mulgi | 'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.."

'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.."

सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.  ऐश्वर्या नारकर या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अभिनय करत आहेत. या मालिकेत ऐश्वर्या साकारत असलेल्या रुपाली राजाध्यक्ष भूमिकेला चांगलं प्रेम मिळतंय. ऐश्वर्या मालिकेत  खलनायक पद्धतीची भूमिका साकारत आहेत. नुकतीच एका युजरने ऐश्वर्या यांच्या रीलखाली मालिकेविषयी कमेंट केलीय. त्यावर ऐश्वर्या यांनीही सडेतोड उत्तर दिलंय. 

युजरने कमेंट केलीय की, "तुमच्या हावभावासारखीच तुमची सीरियल झाली आहे. आधी आम्ही न चुकत सिरीयल पाहायचो. आता  नाही पाहत. माती  केली चांगल्या सीरियलची. आटोपते घ्या आता." युजरने केलेल्या या कमेंटला ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर देत म्हणाल्या, "तुम्ही बघत नाहीत हे उत्तम. एका मालिकेवर १०० कुटुंब अवलंबून असतात. त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसलं तरी आम्हाला आहे. सो तुम्ही टीव्ही बंद केलात तर जास्त बरं. सीरियल बंद व्हायची तेव्हा होईल."

 

याच कमेंटमध्ये एकाने ऐश्वर्या यांना टॅग करुन प्रेक्षकांचा आदर करा अशी टिप्पणी केलीय. त्यावर ऐश्वर्या म्हणाल्या, "आम्ही नक्कीच आदर करु. पण एका मालिकेवर १०० कुटुंब अवलंबून आहेत हा फॅक्ट त्यांना माहित नाही. ही इंडस्ट्री आहे. इथलं मालिकाविश्व हे उत्पन्नाचं माध्यम आहे. तुम्हाला आवडत नसेल तर टीव्ही बंद करु शकता. १०० कुटुंबाची ओढाताण होण्यापेक्षा हाच उपाय चांगला आहे. प्रेक्षक म्हणून तुम्हीही आम्हाला गृहीत धरु शकत नाही. या इंडस्ट्रीचा आदर करा." अशाप्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी युजर्सला खणखणीत उत्तर दिलंय.

Web Title: Aishwarya Narkar reply to the user who said dont like satvya mulichi satvi mulgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.