ऐश्वर्या कपिलच्या शोमध्ये!
By Admin | Updated: April 30, 2016 02:02 IST2016-04-30T02:02:41+5:302016-04-30T02:02:41+5:30
कपिल शर्माचा शो नव्याने सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम ‘फॅन’ चित्रपटाचे प्रमोशन तिथे झाले.

ऐश्वर्या कपिलच्या शोमध्ये!
कपिल शर्माचा शो नव्याने सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम ‘फॅन’ चित्रपटाचे प्रमोशन तिथे झाले. त्यानंतर बागी आणि आता सरबजीतची टीमही येऊन गेली. या वेळी ऐश्वर्या रॉय-बच्चनने एन्ट्री केल्यानंतर उपस्थित सर्व जण घायाळ झाले इतकी ती सुंदर दिसत होती. तिचा सहकलाकार रणदीप हुडादेखील तिथे होता. ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते दोघे या शोमध्ये आले होते. ऐश्वर्या रॉय यात दलबीर कौर हिची भूमिका साकारत आहे.
ऐश्वर्या आता आता लवकरच ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये दिसणार आहे.