Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:22 IST2025-10-10T17:21:51+5:302025-10-10T17:22:44+5:30
Bobby Darling : बॉबीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती अशक्त झालेली पाहायला मिळत आहे. चालायला, बोलायला देखील तिला त्रास होतो, चेहरा थकलेला दिसत आहे.

Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
अभिनेत्री बॉबी डार्लिंगची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. आजारपणामुळे बॉबी इंडस्ट्रीपासून काही काळ दूर होती. आता ती पुन्हा परतली आहे. पण तिची अवस्था पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. बॉबीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती अशक्त झालेली पाहायला मिळत आहे. चालायला, बोलायला देखील तिला त्रास होतो, चेहरा थकलेला दिसत आहे, मात्र डोळ्यांत अजूनही तीच चमक पाहायला मिळाली. चाहत्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने खुलासा केला की, तिची तब्येत बरी नव्हती आणि पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम झाला होता, पण आता ती बरी झाली आहे. "माझी तब्येत थोडी ठीक नव्हती. पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम होता... आता मी पूर्णपणे ठीक आहे, मी कामावर परतण्यास तयार आहे" असं म्हटलं. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बॉबी हळूहळू चालताना दिसत आहे.
"मी अनुभवी आणि टॅलेंटेड अभिनेत्री"
फिल्म इंडस्ट्रीत पुन्हा कमबॅक करणार का? असा प्रश्न विचारला असता अजिबात संकोच न करता बॉबी म्हणाली, "नक्कीच, मी परत येणार आहे... आणि यावेळी पूर्वीपेक्षाही अधिक चांगलं असेल. मी माझ्या सर्व निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते मी बॉबी डार्लिंग आहे. मी परत आले आहे. मी एक अनुभवी आणि टॅलेंटेड अभिनेत्री आहे, मला फक्त एक चांगला रोल द्या."
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
"मला काम हवं आहे"
बॉबी डार्लिंगचा प्रवास सोपा नव्हता. जुलै २०२५ मध्ये, ती एका पॉडकास्टवर दिसली, जिथे तिने तिच्या डिप्रेशनबद्दल आणि कठीण काळाबद्दल मोकळेपणाने सांगितलं. ती म्हणाली, "मी खूप वाईट काळातून जात आहे. मला काम हवं आहे, नाहीतर मी खचून जाईन... कधीकधी मला स्वतःला संपवावस वाटतं." त्यावेळी, तिने प्रोड्यूसर एकता कपूरला काम देण्यासाठी एक मेसेज देखील पाठवला.
"माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
"मी पुन्हा लोकांची मनं जिंकेन"
बॉबी म्हणाली की, ती आता पूर्णपणे तयार आहे आणि यावेळी मागे हटणार नाही. मी पूर्वीपेक्षा अधिक स्ट्राँग आहे. जर मला चांगली संधी मिळाली तर मी पुन्हा लोकांची मनं जिंकेन. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एक चमक होती. तिचे हे शब्द ऐकून ती खरोखरच चाहते भावूक झाले. बॉबी डार्लिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.