निर्मितीनंतर मृण्मयीचे दिग्दर्शन
By Admin | Updated: November 7, 2015 00:40 IST2015-11-07T00:40:26+5:302015-11-07T00:40:26+5:30
‘कुंकू’फेम मृण्मयी देशपांडेने अनुराग चित्रपटाची निर्मिती आणि त्यात अभिनयही केला हे आपण सारे जाणतोच. आता ‘पुढचं ऐका....’ यात मृण्मयीने अजून एक मोठी उडी मारली आहे.

निर्मितीनंतर मृण्मयीचे दिग्दर्शन
‘कुंकू’फेम मृण्मयी देशपांडेने अनुराग चित्रपटाची निर्मिती आणि त्यात अभिनयही केला हे आपण सारे जाणतोच. आता ‘पुढचं ऐका....’ यात मृण्मयीने अजून एक मोठी उडी मारली आहे. ‘अनुराग’ चित्रपटाव्यतिरिक्त मृण्मयीचे दोन प्रोजेक्टसाठी काम सुरू आहे. अनुराग चित्रपटाच्या पोस्टर रिलीज कार्यक्रमादरम्यान या प्रोजेक्टची अनाउन्समेंट करण्यात आली. ते प्रोजेक्ट म्हणजे मृण्मयी देशपांडे आता फक्त एक नाही, तर चक्क दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहे. ‘अनुराग’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रतिष्ठित नेत्रतज्ज्ञ डॉ. अंबरीश दराक यांच्याकडून तिने अनुराग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दिग्दर्शनाचे धडे घेतले आहेत.
पहिला चित्रपट आहे ‘अथर्व उंट’; मात्र दुसऱ्या चित्रपटाचे नाव आता जाहीर करण्यात आलेले नाही. पण ते लवकरच जाहीर करण्यात येईल. त्यामुळे मृण्मयी देशपांडे सध्या फुल आॅन फॉर्ममध्ये आहे, असंच म्हणावं लागेल. तिने निर्मिती केलेला एक
आणि दिग्दर्शित करणारे २ चित्रपट नक्कीच यश मिळवतील, याबद्दल शंकाच नाही.