गरीब मुलीला पैसे दिल्यानंतर, मुलगाही काजोलच्या गाडीकडे धावला अन्…; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 07:07 PM2022-10-20T19:07:42+5:302022-10-20T19:10:52+5:30

हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स काजोलला चांगलेच ट्रोल करत आहेत.

After paying the poor girl, the boy also ran towards Kajol's car but kajol not giving money Watch the VIDEO | गरीब मुलीला पैसे दिल्यानंतर, मुलगाही काजोलच्या गाडीकडे धावला अन्…; पाहा VIDEO

गरीब मुलीला पैसे दिल्यानंतर, मुलगाही काजोलच्या गाडीकडे धावला अन्…; पाहा VIDEO

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री काजोल नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. पण यावेळी नेटकऱ्यांनी तिला रडारवर घेतले आहे. काजोल बुधवारी एका मॉलमधून बाहेर पडताना दिसून आली. काजोल तिच्या कारकडे जात असताना एक लहान मुलगी तिला पैसे मागू लागली. यावर कारमध्ये बसल्यानंतर काजोलने त्या मुलीला पैसे दिते. यानंतर, एक मुलगाही तेथे धावत आला. मात्र, त्याच्याकडे काजोलने दूर्लक्ष केले. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स काजोलला चांगलेच ट्रोल करत आहेत.

व्हायरल होतोय काजोलचा व्हिडिओ -
या व्हिडिओमध्ये काजोल कारमध्ये बसल्यानंतर, तिच्या कारचा दरवाजा उघडून एका चिमुरडीला पैसे देताना दिसत आहे. तिला पैसे देताच आणखी एक गरीब मुलगाही तिच्या कारकडे धावतो आणि काजोलच्या कारची खिडकी नॉक करतो. मात्र, यावेळी काजोल त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर, आता लोक काजोलला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करताना म्हटले आहे, की 'दुसरा मुलगा पैसे घेण्यासाठी आला, पण दिले नाही, काजोलकडे पैशांची कमतरता निर्माण झाली आहे का?'. तसेच आणखी एका युजरने म्हटले आहे, की 'आपल्याकडे तर एढे पैसे आहेत. या मुलाला 100 रुपये जरी दिले असते, तर आपली संपत्ती कमी झाली नसती मॅम.' आणखी एका युजरने तर, 'जेवढे मोठे लोक, तेवढे मोठे भिकारी असतात,' असे म्हटले आहे.

गुड वाइफ सीरीजमध्ये दिसणार काजोल -
काजोल या पूर्वीही सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. काजोलच्या कामासंदर्भात बोलायचे झाल्यास शेवटच्या वेळी ती नेटफ्लिक्स चित्रपट 'त्रिभंगा' मध्ये दिसून आली होती. याशिवाय ती लवकरच डिज्नी + हॉटस्टारच्या सीरीज 'द गुड वाइफ' मध्ये दिसून येणार आहे.
 

Web Title: After paying the poor girl, the boy also ran towards Kajol's car but kajol not giving money Watch the VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.