प्री प्रोडक्शनचे काम संपल्यानंतरच स्टारकास्टची निवड करू!
By Admin | Updated: June 2, 2017 04:30 IST2017-06-02T04:30:23+5:302017-06-02T04:30:23+5:30
रितेश देशमुखने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्याचे

प्री प्रोडक्शनचे काम संपल्यानंतरच स्टारकास्टची निवड करू!
रितेश देशमुखने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या चित्रपटाकडे आतापर्यंतचा सगळ्यांत बिग बजेट सिनेमा म्हणून पाहण्यात येते आहे. लोकमत सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच रितेशने त्यांच्या बिग बजेट मराठी सिनेमाविषयी माहिती दिली आहे. याविषयी रितेश सांगतो, ‘हा विषय खूप मोठा आहे. सध्या आम्ही या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहोत. स्क्रिप्ट आॅल मोस्ट लॉक झाली आहे. महाराजांचे कर्तृत्व, त्यांचे विचार, अशा सगळ्या गोष्टींची सिनेमात मांडणी असेल, त्यांचे काम या सगळ्या गोष्टी त्याच मापदंडावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे निर्माण करण्यात येणार हा आतापर्यंतचा सगळ्यात बिग बजेट चित्रपट असणार आहे. सध्या प्री प्रोडक्शनचे काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यावर आम्ही या भूमिकेविषयी विचार करू."