अभिनेत्री दिया मिर्झा बोहल्यावर
By Admin | Updated: October 17, 2014 22:49 IST2014-10-17T22:49:04+5:302014-10-17T22:49:04+5:30
भारताची पहिली मिस एशिया पॅसिफिक - प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची अभिनेत्री-निर्माती दिया मिङर हिचे शुभमंगल तिचा बिझनेस पार्टनर साहिल संगाशी आज हरियाणाजवळच्या मेहरोलीत होतेय.

अभिनेत्री दिया मिर्झा बोहल्यावर
आज शुभविवाह : बिझनेस पार्टनर साहिल संगाशी होतोय मेहरोलीत प्रेमविवाह
पूजा सामंत ल्ल मुंबई
भारताची पहिली मिस एशिया पॅसिफिक - प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची अभिनेत्री-निर्माती दिया मिङर हिचे शुभमंगल तिचा बिझनेस पार्टनर साहिल संगाशी आज हरियाणाजवळच्या मेहरोलीत होतेय. दिया मिङरचे अत्यंत जवळचे आप्तेष्ट-बॉलीवूडमधील सितारे म्हणजे लग्नाचे बि:हाड दिया मिङरच्या मेहंदी-संगीत-शादी-रिसेप्शनसाठी दिल्लीकडे कालच (17 तारखेला) रवाना झालेय.
‘रहना है तेरे दिल में’ या सिनेमापासून अभिनयात पदार्पण केलेल्या दिया मिङरने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आणि ती पहिली मिस एशिया पॅसिफिक ठरली. काही यशस्वी तर काही अयशस्वी सिनेमांनंतर दियाने चित्रपट निर्मितीत पदार्पण केले; आणि विद्या बालनला प्रमुख भूमिकेत घेऊन ‘बॉबी जासूस’ चित्रपटाची निर्मिती केली.
बंगाली आई-जर्मन पिता आणि सावत्र पिता मुस्लीम असलेल्या दिया मिङरचा वर पंजाबी आहे. दिया मिङरच्या चेह:यावर नववधूचा आरक्त लालिमा पसरलेला दिसतो. दियाला लग्नाविषयी आपला आनंद लपवता आला नाही. उद्यापासून मी एका नव्या जीवनाला आरंभ करतेय, साहिलशी माझी मैत्री होऊन दोन वर्षे झालीत. आमचे लग्न आर्य समाज पद्धतीने होतेय, कारण माङो कुटुंबीय सर्वधर्मीय आहेत. नववधू दिया मिङरचा शादी का जोडा प्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू कुमार यांनी डिझाइन केलाय. रितू कुमार यांनी दियाच्या लग्नाच्या पोशाखाबद्दल माहिती दिली. दिया तिच्या लग्नात घालणार असलेला ड्रेस शाही ठरणार आहे. कारण त्याचे डिझायनिंग रितू कुमार यांनी 15व्या शतकातील आग्रा शहरातील शाही स्त्रिया जसा कळीदार (अनारकली पॅटर्न) ड्रेस घालत तसा डिझाइन केला असून, त्यावर गोटा पट्टीने एम्ब्रॉयडरी केली आहे. त्यावर सोनेरी जरी-बुट्टीचे डिझाइन केल्याने हा पोशाख शाही लिबास ठरलाय. विवाहानंतरच्या भोजनासाठी दिया मिङर शांतनू निखिल यांनी डिझाइन केलेला ड्रेस तर संगीत कार्यक्रमासाठी फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला ट्रुझो (शाही विवाह ड्रेस) मध्य ेदिसेल.
तारकांनी नामवंत फॅशन डिझायनर्सकडून आपल्या लग्नाचे पोशाख बनवून घेतल्याचे निदर्शनास येते. कपूर भगिनी- करिश्मा आणि करिनाने त्यांच्या लग्नासाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रकडून डिझाइन केलेले लेहंगे बनवले होते.
तयारी जोरात सुरू
4आपल्या बिग डे- अर्थात लग्नासाठी चंदेरी दुनियेतल्या तारकांनी नामवंत फॅशन डिझायनर्सकडून आपल्या लग्नाचे पोशाख बनवून घेतल्याचे निदर्शनास येते. कपूर भगिनी- करिश्मा आणि करिनाने त्यांच्या लग्नासाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रकडून डिझाइन केलेले लेहंगे बनवले होते.
4तर नीता लुल्लाकडून ऐश्वर्या राय-बच्चन, ईशा कोप्पीकर, जेनेलिया डिसोझा-देशमुख, मलायका अरोरा-खानने नववधूचे ड्रेस डिझाइन करवून घेतले होते. या स्पर्धेत मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीसही आहे.