‘एकाच क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करण्यात असतो फायदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 03:10 IST2017-03-06T03:10:05+5:302017-03-06T03:10:05+5:30

किर्ती गायकवाड-केळकरने सात फेरे, सिंदूर तेरे नाम का अशा अनेक हिट मालिकांमध्ये काम केले

'The advantage of marrying a person in the same area' | ‘एकाच क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करण्यात असतो फायदा’

‘एकाच क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करण्यात असतो फायदा’


- प्राजक्ता चिटणीस
किर्ती गायकवाड-केळकरने सात फेरे, सिंदूर तेरे नाम का अशा अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. पण अभिनेता शरद केळकरसोबत लग्न केल्यानंतर ती अभिनयापासून दूर गेली. ससुराल सिमर का या मालिकेद्वारे ती सहा वर्षांनंतर कमबॅक करत आहे. तिच्या या कमबॅकविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...
कीर्ती सहा वर्षं तू अभिनयापासून दूर होती, तू इतका मोठा ब्रेक का घेतला होता?
- छोट्या पडद्यावर कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर अनेक मालिकांमध्ये मी काम केले. अनेक मालिकांमधील माझ्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्यादेखील होत्या. पण शरदसोबत लग्न झाल्यावर मी संपूर्ण वेळ कुटुंबाला द्यायचे ठरवले. मुलगी झाल्यावर तर माझा सगळा वेळ हा केवळ तिच्यासाठी होता. मुलगी लहान असताना मला अनेक मालिकांच्या आॅफर्स येत असत. पण मी या दरम्यान कधी कोणती पटकथादेखील ऐकली नाही. कारण एखादी पटकथा ऐकली आणि मला ती आवडली तर मला चुकचुकल्यासारखे होईल असे मला वाटत होते. पण आता माझी मुलगी मोठी झाली असून ती शाळेत जायला लागली आहे. त्यामुळे मी आता घर आणि करिअर यांच्यात ताळमेळ घालण्याचे ठरवले आहे.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेत तू दीपिका कक्कडला रिप्लेस करणार आहेस. कोणत्याही कलाकाराला रिप्लेस करणे कितपत कठीण असते असे तुला वाटते?
- ससुराल सिमर का या मालिकेची मी फॅन होते. या मालिकेतील दीपिका कक्कडची भूमिका मला खूप आवडत होती. तिने या मालिकेला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे तिला मी रिप्लेस करतेय असे मी कधीच म्हणणार नाही. मी केवळ ही व्यक्तिरेखा पुढे घेऊन जात आहे असे मला वाटते. या भूमिकेला अनेक छटा असून, ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूप मजा येणार आहे.

शरद आणि तू दोघेही अभिनय क्षेत्रातील आहात. एकाच क्षेत्रातील व्यक्तिसोबत लग्न करणे फायदेशीर असते असे तुला वाटते का?
- मी आणि शरद दोघेही एकाच क्षेत्रातील असल्याने आम्हाला दोघांना आमच्या कामाच्या पद्धती, वेळा, काम करताना आमच्या समोर येणाऱ्या अडचणी सगळे काही माहीत असते. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजू शकतो. त्यामुळे एकाच क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करणे हे सोईस्कर असते असे मला वाटते.

तू आता अभिनयक्षेत्रात परत आली आहेस. तुला आणि शरदला आम्हाला एकत्र पाहायला मिळेल का?
- सध्या तरी शरद त्याच्या चित्रपटांमध्ये प्रचंड व्यग्र आहे. तसेच मी यापुढे मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असणार आहे. त्यामुळे सध्या तरी आमच्या दोघांचा एकत्र काम करण्याचा काहीही विचार नाही. पण एकदा मी मालिकेत थोडेशी सेटल झाले, की नक्कीच याबाबत विचार करू. पण सध्या तरी आम्हाला एकत्र पाहता येणार नाहीये.

Web Title: 'The advantage of marrying a person in the same area'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.