‘फितूर’ चित्रपटामध्ये आदित्यचा ट्रिपल लूक!
By Admin | Updated: November 8, 2015 02:36 IST2015-11-08T02:36:05+5:302015-11-08T02:36:05+5:30
अभिनेता आदित्य रॉय कपूर याचे आगामी चित्रपट ‘फितूर’मध्ये तीन लूक दिसणार आहेत. २०१४ च्या ‘दावत ए ईश्क’नंतर आदित्य मोठ्या स्क्रीनवर प्रथमच दिसणार आहे.

‘फितूर’ चित्रपटामध्ये आदित्यचा ट्रिपल लूक!
अभिनेता आदित्य रॉय कपूर याचे आगामी चित्रपट ‘फितूर’मध्ये तीन लूक दिसणार आहेत. २०१४ च्या ‘दावत ए ईश्क’नंतर आदित्य मोठ्या स्क्रीनवर प्रथमच दिसणार आहे. काश्मिरी शहरी मुलाच्या रोलमध्ये तो दिसेल. त्याच्या भूमिकेची गरज म्हणून त्याचे तीन लूक या चित्रपटात दिसणे आवश्यक आहे. हे लूक त्याने तितक्याच ताकदीने देणेही गरजेचे आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी आदित्य आणि कॅटरिना कैफ यांना सिल्व्हर स्क्रीनवर प्रथमच एकत्र आणले आहे. हा चित्रपट चार्ल्स डिकेन्स यांच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन’ या कादंबरीवर आधारित असून, १२ फ ेब्रुवारी २०१६ रोजी रिलीज होणार आहे.