पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:05 IST2025-07-10T15:04:32+5:302025-07-10T15:05:04+5:30
कोण आहे ही हॉट अँड बोल्ड मिस्ट्री वुमन?, गोव्याशी आहे कनेक्शन

पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) बॉलिवूडमधला मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. वयाच्या ३९ व्या वर्षीही त्याच्या गुड लूक्सवर तरुणी घायाळ होतात. त्याच्या चाहत्यावर्गात तरुणीच खूप आहेत. अनेक मुली त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. काही वर्षांपूर्वी आदित्य अनन्या पांडेला डेट करत होता. त्यांच्या अफेअरची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा होती. मात्र वर्षभरातच त्यांचं ब्रेकअप झालं. आता आदित्य पुन्हा प्रेमात पडला आहे. कोण आहे ती?
आदित्य रॉय कपूरचा 'मेट्रो इन दिनो' सिनेमा नुकताच रिलीज झाला. यामध्ये त्याची सारा अली खानसोबत जोडी होती. सध्या आदित्य व्हेकेशन एन्जॉय करत आहे. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्येच एका 'मिस्ट्री गर्ल'ची झलक पाहायला मिळाली. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो दोन जणींसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे. यात त्यांचा चेहरा मात्र दिसत नाही. आदित्यसोबत नक्की कोण आहे याचा शोध चाहत्यांनी लावला आहे.
आदित्य रॉय कपूरसोबतची ही मिस्ट्री वुमन आहे जॉर्जिना डिसिल्वा. दिसायला हॉट अशी ही जॉर्जिना गोव्याची आहे. ती फोटोग्राफर आणि स्वत: मॉडेलही आहे. जॉर्जिनाने २०१७ मध्ये सॅलफोर्ड युनिव्हर्सिटीमधून फॅशन इमेज मेकिंग आणि स्टायलिंग मध्ये फर्स्ट क्लास ऑनर्स बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री घेतली आहे. फॅशन फोटोग्राफी, फिल्म फोटोग्राफी, आर्ट डायरेक्शन आणि मॉडेलिंग तिचं पॅशन आहे. २०१६ मध्ये तिची पहिली मॅगझीन पब्लिश झाली होती. यामध्ये कोकण कनेक्शन होतं. याचं पूर्ण शूट आणि स्टायलिंग गोव्यात तिच्या आजोबांच्या गावात झालं होतं. याशिवाय तिने टँक मॅगजीन, वोग रनवे, नाउनेस, लेवीज, दिलारा फिंडिकोग्लू, लेस बॉइज लेस गर्ल्स आणि द ब्रिज कंपनीसारख्या अनेक नावाजलेल्या ब्रँड्स आणि पब्लिकेशनसोबत काम केलं आहे.