'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी चाल'वर प्रेक्षक फिदा, नक्की काय आहे नृत्यप्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:28 PM2024-05-14T16:28:03+5:302024-05-14T16:29:47+5:30

'सैय्या हटो जाओ' गाण्यावर आदितीची 'गजगामिनी चाल' पाहिलीत का?

Aditi Rao Hydari s Gajagamini walk seen in Heeramandi series have you watched | 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी चाल'वर प्रेक्षक फिदा, नक्की काय आहे नृत्यप्रकार?

'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी चाल'वर प्रेक्षक फिदा, नक्की काय आहे नृत्यप्रकार?

संजय लीला भन्साळींची (Sanjay Leela Bhansali) वेबसीरिज 'हीरामंडी' (Heeramandi) सध्या गाजत आहे. सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. भन्साळींचा प्रोजेक्ट म्हणलं की भव्य सेट, आकर्षक कॉस्च्युम हे आलंच. मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्डा, शरमिन सहगल आणि संजीदा शेख या सहा अभिनेत्री सीरिजच्या जान आहेत. यातील आदिती राव हैदरीच्या गजगामिनी चाल' वर प्रेक्षक फिदा झालेत. नक्की काय आहे ही चाल?

अभिनेत्री आदिती राव हैदरीने 'हीरामंडी'मध्ये 'बिब्बोजान' ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेत ती कमालीची सुंदर आणि बिंधास्त दिसत आहे. एका एपिसोडमध्ये 'सैय्या हटो जाओ' हे गाणं आदितीवर चित्रीत करण्यात आलं आहे. आदिती मुजरा केल्यानंतर ती कॅमेऱ्याकडे पाठ करुन पुढे चालताना दिसते. यावेळी ती जो वॉक करते त्याला 'गजगामिनी चाल' असं म्हणतात. कथ्थक शिकणाऱ्यांना ही चाल शिकवली जाते. गज म्हणजेच हत्ती. याचा अर्थ हत्तीसारखंच हलत डुलत चालणं होय.हा कथ्थक नृत्याचा महत्वपूर्ण भाग आहे.

ही चाल कमालीची प्रसिद्ध आहे. आदितीने तिच्या या आकर्षक वॉकमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. याआधी मधुबाला आणि माधुरी दीक्षितनेही गजगामिनी चाल केली आहे असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रेक्षकांनी आदितीच्या या वॉकवर टाळ्यांचा कडकडाट केलाय. 

१ मे रोजी 'हीरामंडी' सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. सीरिजमध्ये सहा अभिनेत्रींशिवाय फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन आणि ताहा शाह हे अभिनेतेही आहेत.

Web Title: Aditi Rao Hydari s Gajagamini walk seen in Heeramandi series have you watched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.