आदिनाथ करणार पर्णसोबत काम
By Admin | Updated: August 18, 2016 04:33 IST2016-08-18T04:33:24+5:302016-08-18T04:33:24+5:30
आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांची जोडी आपल्याला लवकरच एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आदिनाथ सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगतो

आदिनाथ करणार पर्णसोबत काम
आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांची जोडी आपल्याला लवकरच एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आदिनाथ सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगतो, ‘मी लवकरच एका चित्रपटात तुम्हाला दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश जोशी यांनी केले आहे. महेश मांजरेकर, पर्ण पेठे यांच्यासोबत मी या चित्रपटात काम करत आहे. एवढेच नाही, तर अजूनही अनेक मोठे कलाकार तुम्हाला या चित्रपटात दिसतील. या चित्रपटाचे नाव अजून तरी ठरलेले नाही, पण या सिनेमातील माझी भूमिका फारच छान आहे. एका वेगळ्या भूमिकेत मी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात बरेच कलाकार असल्याने चित्रीकरणाच्या वेळी आम्ही खूपच मजा केली. माझी या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची मला खात्री आहे.’ आदिनाथ आणि पर्ण ही एक फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांची केमिस्ट्री
प्रेक्षकांना आवडते की नाही, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला कळेल.