Urfi Javed Hospitalized: उर्फी जावेदची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; दोन-तीन दिवसांपासून होत होत्या उलट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 20:25 IST2022-08-06T20:24:41+5:302022-08-06T20:25:56+5:30

"उर्फी जावेदची प्रकृती गेल्या 2-3 दिवसांपासून बरी नव्हती. तिला सातत्याने उलट्या होत होत्या. तसेच, तिला 103 ते 104 एवढा तापही होता."

Actress urfi javed hospitalized in emergency at kokilaben hospital in mumbai | Urfi Javed Hospitalized: उर्फी जावेदची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; दोन-तीन दिवसांपासून होत होत्या उलट्या

Urfi Javed Hospitalized: उर्फी जावेदची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; दोन-तीन दिवसांपासून होत होत्या उलट्या


आपल्या बोल्ड ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi Javed) प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. माध्यमांतील वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती बरी नव्हती. 

टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फी जावेदची प्रकृती गेल्या 2-3 दिवसांपासून बरी नव्हती. तिला सातत्याने उलट्या होत होत्या. तसेच, तिला 103 ते 104 एवढा तापही होता. यामुळे तिला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्फीच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर तिला नेमके काय झाले आहे, हे कळू शकेल.

उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मात्र, सध्या आजारी असल्याने तिने गेल्या दोन दिवसांपासून इन्स्टाग्रामवर कुठल्याही प्रकारची पोस्ट केलेली नाही. 4 जूनला तिने एक पोस्ट टाकली होती. ते एक टॉपलेस फोटोशूट होते. यात ती आपल्या केसांनी ब्रेस्ट कव्हर करताना दिसत आहे. तिच्या या फोटोशूटनंतर, सोशल मीडिया युजर्सनी दिला जबरदस्त ट्रोल केले होते. 
 

Web Title: Actress urfi javed hospitalized in emergency at kokilaben hospital in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.