तडकाफडकी ब्रेकअपनंतर खूप रडली होती तापसी, कोण होतं तापसीचं पहिलं प्रेम?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 01:32 PM2024-04-05T13:32:40+5:302024-04-05T14:24:00+5:30

तापसी पन्नू ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आलीये.

Actress Taapsee Pannu First Love and breakup Story During School | तडकाफडकी ब्रेकअपनंतर खूप रडली होती तापसी, कोण होतं तापसीचं पहिलं प्रेम?

तडकाफडकी ब्रेकअपनंतर खूप रडली होती तापसी, कोण होतं तापसीचं पहिलं प्रेम?

तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आलीये.  तापसीने तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत लग्नगाठ बांधली. परंतु अद्यापही तापसीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. तापसी पन्नू आणि मॅथियास गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या जोडप्याचं नातं कोणापासून लपलेलं नव्हतं. पण, तुम्हाला माहितेय का तापसीचं पहिलं प्रेम हे मॅथियास बो नाहीतर एक दुसरीच व्यक्ती होती. 

पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळचं असतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाही.  तापसीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पहिलं प्रेम आणि ब्रेकअपबद्दल बोलताना दिसत आहे. तापसी पन्नूने एका जुन्या मुलाखतीत पहिलं प्रेम आणि ब्रेकअपबद्दल सांगितलं होते. नववीमध्ये असताना तापसी पहिल्यांदा रिलेशनशीपमध्ये अडकली होती. पण, दहावीच्या परीक्षांचं कारण देत तिच्या बॉयफ्रेंडनं ब्रेकअप केलं होतं. 

तापसी म्हणाली होती की, "ज्या व्यक्तीला मी आयुष्यात पहिल्यांदा डेट केलं होतं, त्या व्यक्तीनं मला दहावीच्या बोर्डाच्या पेपरची तयारी करायची आहे, असं सांगून ब्रेकअप केलं होतं. त्याकाळी आमच्याकडे मोबाईल फोन नव्हते.  पीसीओ असायचा. मला आठवतं की ब्रेकअपनंतर मी माझ्या घरामागे असलेल्या पीसीओवर जाऊन त्याला फोन करायचे आणि रडत रडत विचारायचे, मला सोडून का जात आहेस'.

तापसीने 2010 मध्ये तेलुगू चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. तर 2012 मध्ये चष्मेबद्दूर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बेबी, पिंक, द गाझी अॅटक, नाम शबाना, मुल्क, मनमर्झिया यासारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. तर लवकरच तापसी  'फिर आयी हसीन दिलरुबा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा  'हसीन दिलरुबा' चा सीक्वल आहे, ज्याचा प्रीमियर केवळ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर जुलै 2021 मध्ये झाला होता. "फिर आयी हसीन दिलरुबा" च्या प्रदर्शनाची तारीख  अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

Web Title: Actress Taapsee Pannu First Love and breakup Story During School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.