अभिनेत्री श्वेता तिवारी, रोशनी चोप्राकडे Good news
By Admin | Updated: July 10, 2016 15:06 IST2016-07-10T15:06:01+5:302016-07-10T15:06:01+5:30
छोटया पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी आणि रोशनी चोप्रा गरोदर असल्याची अफवा अखेर खरी ठरली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी, रोशनी चोप्राकडे Good news
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - छोटया पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी आणि रोशनी चोप्रा गरोदर असल्याची अफवा अखेर खरी ठरली आहे. बॉम्बे टाइम्सच्या वृत्तानुसार श्वेता तिवारी आणि रोशनी चोप्राच्या घरी दुस-यांदा पाळणा हलणार आहे. 'कसोटी जिंदगी की' या मालिकेतून श्वेता तिवारीचे नाव घरघरात माहित झाले.
श्वेताचा पहिला विवाह राजा चौधरी बरोबर झाला होता. पण दोघांचे पटत नसल्याने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर श्वेताने जुलै २०१३ मध्ये अभिनव कोहलीबरोबर दुसरे लग्न केले. पहिल्या विवाहापासून श्वेताला एक मुलगी आहे. पलक तिचे नाव असून ती १५ वर्षांची आहे. नोव्हेंबर महिन्यात श्वेताच्या घरी पाळणा हलणार आहे.
त्याचबरोबर छोटयापडद्यावरील आणखी एक ओळखीचा चेहरा म्हणजे रोशनी चोप्रा. 'कसम से' ही रोशनची मालिका भरपूर गाजली होती. रोशनीने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद कुमार बरोबर लग्न केले. ती सुद्धा दुस-यांदा आई होणार आहे. त्यांना तीनवर्षांचा मुलगा आहे. रोशनीने इन्स्टाग्रामवरुन तिच्या प्रेगनन्सीची माहिती दिली.