अभिनेत्री, कवयित्री लीना चंदावरकर यांचा वाढदिवस
By Admin | Updated: August 29, 2016 17:59 IST2016-08-29T09:53:16+5:302016-08-29T17:59:40+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री,कवीयात्री लीना चंदावरकर यांचा आज (२९ ऑगस्ट) वाढदिवस.

अभिनेत्री, कवयित्री लीना चंदावरकर यांचा वाढदिवस
संजीव वेलणकर
पुणे, दि. २९ - हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री, कवयित्री लीना चंदावरकर यांचा आज (२९ ऑगस्ट) वाढदिवस. २९ ऑगस्ट १९५० रोजी धारवाड येथील एका मराठी कुटुंबात लीना यांचा जन्म झालाय. सुरुवातीला जाहिरातीत काम केल्यावर मा. सुनील दत्त यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. तो चित्रपट होता मन की मित, १९६९ ते १९७९ या काळात त्यांनी अनेक चित्रपटात कामे केली. पण मेहबुब की मेहंदी या चित्रपटाने त्यांना नाव कमावून दिले. सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसांतच बांदोडकर यांचे निधन झाले. किशोर कुमार यांच्याशी १९७९ मध्ये भेट झाली. तू उत्तम कलावंत आहेस, अभिनय सुरू ठेव, असं सांगितलं. त्या वाक्यानेच त्यांना एकत्र आणलं. त्यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. मा. लीना चंदावरकर किशोर कुमार यांच्याबाबत म्हणतात, किशोर कुमार नावाचं व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आलं… आणि जीवनच बदलून गेलं… अवघा साडेसात वर्षांचा सहवास मला लाभला… मिळविलेला आनंद खूप काळ टिकत नाही, पण गमाविलेली गोष्ट आयुष्यभर आठवत राहते, असं माझ्या आयुष्यात झालं… प्रचंड हुशार, समोरच्याला आनंदी ठेवण्याची जबरदस्त ताकद आणि माणुसकी ही त्यांची वैशिष्ट्ये… त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच मी गाणी लिहू शकले.