अ‍ॅक्ट्रेसच्या कॅटफाइट्समुळे हादरले बॉलिवूड!

By Admin | Updated: March 12, 2017 01:58 IST2017-03-12T01:57:56+5:302017-03-12T01:58:42+5:30

करिअरमध्ये भरारी घेत असताना दुसऱ्याशी स्पर्धा करून इच्छित ध्येय गाठावे लागते, हा जणू काही प्रत्येक क्षेत्रातला नियमच बनला आहे. त्याला बॉलिवूडही अपवाद नाही.

Actress catfights huddle Bollywood! | अ‍ॅक्ट्रेसच्या कॅटफाइट्समुळे हादरले बॉलिवूड!

अ‍ॅक्ट्रेसच्या कॅटफाइट्समुळे हादरले बॉलिवूड!

- Satish Dongre

करिअरमध्ये भरारी घेत असताना दुसऱ्याशी स्पर्धा करून इच्छित ध्येय गाठावे लागते, हा जणू काही प्रत्येक क्षेत्रातला नियमच बनला आहे. त्याला बॉलिवूडही अपवाद नाही. फरक फक्त एवढाच, की इथली स्पर्धा ही खूपच अटीतटीची असते. त्यातही बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसमधल्या कॅटफाइट्स तर पूर्वांपार चालत आलेल्या आहेत. काही अ‍ॅक्ट्रेसमधील कॅटफाइट्स अशा आहेत की, ज्या ९०च्या दशकापासून सुरू आहेत. अर्थात हा ‘कोल्डवॉर’ जरी असला तरी बऱ्याचदा त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलेला आहे. कारण आपल्या प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देण्याची एकही संधी या अ‍ॅक्ट्रेसकडून दवडली जात नाही. अशाच काही ‘कॅटफाइट्स’चा वृत्तांत...

दीपिका-करिना-बिपाशा
दीपिका पदुकोन आणि करिना कपूर यांच्यात वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा ती ‘लव्ह आज कल’ या सिनेमात सैफ अली खानच्या अपोझिट होती. करिनाला दीपिकाने सैफसोबत काम करणे अजिबात आवडत नव्हते. पुढे करिनाने त्यांच्यातील वादाला आणखी बळकटी देण्यासाठी दीपिकाच्या ‘कमबख्त इश्क’ या सिनेमाला एपिक फ्लॉप असे म्हटले होते. तसेच दीपिका आणि बिपाशा बसू यांच्यातील कॅटफाइट सर्वश्रुत आहे. ‘बचना ए हसीनो’ या सिनेमात दीपिका आणि बिपाशाने एकत्र काम केले होते. त्या वेळी दीपिका रणबीर कपूरची गर्लफ्रेंड होती. मात्र सिनेमाच्या सेटवर रणबीर आणि बिपाशामध्ये जबरदस्त बॉण्डिग बघावयास मिळत होती. जी दीपिकाला अजिबात पसंत नव्हती. तसेच बिपाशाचे करिनासोबतही कधी सूत जुळले नाही. ‘अजनबी’ या सिनेमात जेव्हा या दोघी एकत्र आल्या तेव्हा त्यांच्यात जबरदस्त वाद होत होते. हा वाद एवढा टोकाला पोहचला होता की, करिनाने बिपाशाच्या कानशिलात लगावली होती. आजही या दोघी एकमेकींना कट्टर दुश्मन समजतात.

ऐश्वर्या रॉय-रानी मुखर्जी
एकेकाळी बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान असलेल्या ऐश्वर्या राय आणि रानी मुखर्जीमधील वाद अजूनही सुरू आहे. या वादाला सुरुवात ‘चलते-चलते’ या सिनेमापासून झाली होती. त्याचे झाले असे की, त्या वेळी ऐश्वर्याचे सलमानसोबत ब्रेकअप झाले होते. सलमानने तर सिनेमाच्याच सेटवर गोंधळही घातला होता. ज्यामुळे निर्मात्यांनी ऐश्वर्याला रिप्लेस करून रानीला संधी देण्याचे ठरविले होते. या सिनेमासाठी ऐश्वर्याने काही सीन शूटही केले होते. अशात तिला डावलल्याने दोघींमध्ये दरी निर्माण झाली.

श्रीदेवी-माधुरी-जुही चावला
८० च्या दशकात श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित दोघीही टॉपच्या अ‍ॅक्ट्रेस होत्या. जेव्हा माधुरीने ‘तेजाब’मधील ‘एक दो तीन...’ हे गाणं केलं तेव्हा ती श्रीदेवीच्या एक पाऊल पुढे निघून गेली. तेथूनच त्यांच्यातील कॅटफाइटला सुरुवात झाली. पुढे दोघींना ‘जमीन’ या सिनेमात एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र त्यात निर्मात्यांना फारसे यश आले नाही. पुढे हा सिनेमाच बंद पडला. श्रीदेवीनंतर माधुरीची जुही चावलासोबत स्पर्धा सुरू झाली. दोघींमध्ये प्रचंड शत्रुत्व वाढले होते. मात्र अचानक या दोघींनी ‘गुलाब गॅँग’मध्ये एकत्र काम केले. या वेळी जेव्हा जुहीला माधुरीसोबतच्या दुश्मनीविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ‘मला माधुरीसोबत यापूवीर्ही अनेक सिनेमांसाठी आॅफर दिली होती. मात्र आमच्यात वैर असल्याने मी त्यास सपशेल नकार दिला आहे.’

प्रियांका-कॅटरिना-दीपिका
एकेकाळी दीपिका पदुकोन आणि कॅटरिना कैफ खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र सध्या या दोघींमध्ये काहीही अलबेल नाही. याचे एकमेव कारण म्हणजे रणबीर कपूर. कॅटरिनामुळेच रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा आणि कॅटरिनामध्ये सध्या जबरदस्त कोल्डवॉर सुरू आहे. प्रियांका आणि दीपिका या जरी चांगल्या मैत्रिणी असल्या तरी कॅटरिना आणि प्रियांकामध्ये ३६चा आकडा आहे. एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. कारण दोघींनाही या शोमध्ये स्टॉपर अ‍ॅक्ट करायचा होता. यात प्रियांकाला धोबीपछाड देत कॅटरिनाने बाजी मारली होती. मात्र त्याचबरोबर या दोघींमधील कॅटफाइटला सुरुवात झाली. त्यानंतर कॅटरिनाने या वादात भर घालताना म्हटले होते की, ‘लोकांची पहिली पसंती मी असल्यानेच मला ही संधी मिळाली.’ कॅटरिनाचे हे वक्तव्य प्रियांकाला डिवचणारे होते. 

करिश्मा कपूर-रविना टंडन
करिश्मा कपूर आणि रविना टंडन यांना भलेही ‘अंदाज अपना-अपना’ या सिनेमामध्ये चांगल्या मैत्रिणींच्या भूमिकेत आपण बिघतले असले तरी, रिअल लाईफमध्ये या दोघींमध्ये जबरदस्त वैर आहे. फराह खानने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘सिनेमामध्ये दोघींनी डान्स करताना एकमेकींची चांगलीच टर्र उडविली होती. येथूनच त्यांच्यात कॅटफाइट्स सुरू झाली होती.

Web Title: Actress catfights huddle Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.